फिरती विज्ञान प्रयोगशाळा प्रकल्प गुहागर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती उत्तर रत्नागिरी जिल्हा (RSS Jankalyan Samiti, North Ratnagiri) यांचा गुहागर तालुक्यात फिरती विज्ञान प्रयोग शाळा प्रकल्प आहे. या प्रकल्पाला विज्ञान विषयातील प्रयोग शिकवणार्या शिक्षकाची (Recruitment for Science Teacher) आवश्यकता आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी मनोहर पवार किंवा दिनेश जाक्कर यांच्या कडे संपर्क करावा.
गुहागर तालुक्यातील 20-25 जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीतर्फे विज्ञान प्रयोगशाळा हा उपक्रम राबविण्यात येतो.
कामाचे स्वरूप
निश्चित केलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आवश्यक ते प्रयोगाचे साहित्य घेऊन जाणे आणि इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांना विज्ञान विषयातील प्रयोग करून दाखविणे, प्रयोग करून घेणे. (फिरतीची नोकरी आहे). असे कामाचे स्वरूप आहे.
पात्रता
या कामासाठी किमान बारावी उत्तीर्ण.
(D.Ed., Graduate चालेल)
पुरुष उमेदवाराची आवश्यकता आहे.
अपेक्षा :
1) उमेदवार गुहागर तालुक्यातील रहिवासी असावा.
2) मोटारसायकल चालविण्याचा परवाना धारक असावा.
3) समाजसेवेची आवड असणारा असावा.
संस्थेच्या नियमानुसार मानधन दिले जाईल.
इच्छुकांनी दिनांक 5/10/ 2021 पर्यंत आपले अर्ज खालील दूरध्वनी क्रमांकावर व्हाट्सअप द्वारे PDF मध्ये पाठवावेत.
प्रकल्प प्रमुख : श्री दिनेश जाक्कर 9420286387
शिक्षण आयाम प्रमुख : श्री मनोहर पवार 9665809910