जाखडी आणि नमन : नृत्य, वादन आणि गायनचा त्रिवेणी संगम
गुहागर, ता. 23 : गेले महिनाभर कोकणात शिमगोत्सव सुरू होता. कोरोनाच्या दोन वर्षांच्या संकटानंतर प्रथमच कोणत्याही निर्बंधांविना हा उत्सव होत असल्याने यावर्षी उत्साहाला उधाण आले होते. आता हा उत्सव समारोपाकडे वळला आहे. यापुढे लग्न समारंभ, वाडीपुजा, गावपुजा आदी कार्यक्रमातून नमन वग या कार्यक्रमांना सुरुवात होईल. या निमित्ताने रत्नागिरी जिल्ह्यातील लोककलावंतांच्या समस्या काय आहेत, नमन, जाखडी यांचा प्रचार, प्रसारातील अडथळे कोणते, पारंपरिकता आणि कला या दोन्ही गोष्टी टिकवण्यासाठी प्रशिक्षण आवश्यक आहे का. यांची चर्चा व्हावी म्हणून हा लेखन प्रपंच. Problems of folk artists
मयूरेश पाटणकर, गुहागर
लोककलावंताची शासन दरबारी उपेक्षाच
रत्नागिरी जिल्ह्यात भाद्रपदात गणपती आणि फाल्गुनातील शिमगा हे उत्सव जाखडी आणि नमन या लोककलांनी समृद्ध केले आहेत. मात्र या लोककलेला शासनमान्य लोककलेचा दर्जा मिळालेला नाही. सांस्कृतिक संचालनालयाच्या यादीत स्थान नाही. शासन दरबारी होणारी ही उपेक्षा थांबावी. अशी मागणी ही कला जपणारे लोककलावंत गेली अनेक वर्ष करत आहेत. Problems of folk artists
कोकणातील या लोककलांचे वैशिष्ट्य म्हणजे सुत्र एकच असले तरी सादरीकरणातील पध्दती गावागावात निरनिराळ्या असतात. परंपरेने आलेल्या चालीरिती, रुढी यांचे प्रतिबंब या लोककलांमध्ये पहायला मिळते. या परंपरा खऱ्या अर्थाने जपण्याचे काम कोकणातील खेडोपाड्यात रहाणारा कष्टकरी समाज करत आहे. Problems of folk artists
या लोककलांचे सादरीकरण एका विशिष्ट कालावधीपुरते आणि धार्मिकतेशी जोडलेले आहे. त्यामुळे अन्यवेळी या लोककलांचे विशेषत: संकासुर, खेळे, गणगौळण यांचे सादरीकरण होत नाही. त्यामुळेच या कला जोपासणाऱ्या कलावंताची शासन दरबारी उपेक्षा होत आहे. या कलेची नोंद शासनाने अधिकृतरित्या लोककला म्हणून केलेली नाही. त्यामुळे या लोककलांच्या सादरीकरणासाठी अनुदान मिळत नाही. Problems of folk artists
जाखडी, संकासुर, नमन, गणगौळण या लोककलांच्या आकर्षक सादरीकरणासाठी खर्च मोठा असतो. एका समुहामध्ये किमान 30 ते 40 लोककलाकार सहभागी असतात. शिवाय साहित्याचा विचार केला जाखडी नृत्य करणाऱ्या एका कलाकाराच्या वेशभुषेसाठी 2500 रुपये खर्च येतो. संकासुराचा पोषाखाची किंमतच 25 ते 30 हजार असते. मृदुंग, झांजवाले, निशाणवाले, राधा यांची वेशभुषा. यासोबत प्रकाश योजना, वाद्य या सर्वांचा विचार केल्यास हा खर्च लाखो रुपयांपर्यंत पोचतो. सादरीकरणासाठी प्रवास खर्चही मोठा होतो. त्यामुळे या लोककलेचा प्रसार संपूर्ण महाराष्ट्रात होऊ शकलेला नाही. Problems of folk artists
लोककलावंताची प्रतिक्रिया
कोकणातील लोककलावंत नमन आणि जाखडी नृत्यात नाविन्यपूर्ण बदल करत आहेत. या लोककलेची शासनाने नोंद केली. सांस्कृतिक संचालनालयाच्या कार्यक्रमांमध्ये सादरीकरणासाठी स्थान दिले. किमान खर्च आणि मानधाची व्यवस्था केली तर महाराष्ट्रात ही लोककला पोचेल. त्यातून लोककलावंताना चार पैसे आणि कलेला प्रतिष्ठा मिळेल.
सुधाकर मास्कर, अध्यक्ष नमन लोककला संस्था, शाखा गुहागर
नाट्यगृहांकडून सहकार्याची अपेक्षा
नमन हा दशावताराप्रमाणेच सांगितिक नाट्यप्रयोग आहे. यामध्ये गण हा श्रध्देचा, गौळण हा उपहासात्मक विनोदांचा आणि वग म्हणजे पौराणिक किंवा सामाजिक विषयावरील नाट्याचा असे तीन भाग असतात. या प्रयोगाला राज्यातील नाट्यगृहांकडून सादरीकरणासाठी सहकार्य मिळावे. ही लोककलावंताची किमान अपेक्षा आहे. Problems of folk artists
कोकणातील अनेकजण नोकरी व्यवसायानिमित्त शहरांमधुन स्थायिक झाले. यांच्यामधील अनेक मंडळी ही गावातील लोककलेशी जोडलेली आहेत. त्यामुळे शहरांमध्ये आता नृत्य, गायन, वादन, अभिनय यांचा संगम असलेले नमन सादर करणारी मंडळांची, लोककलावंताची संख्या वाढत आहे. आपला नोकरी व्यवसाय सांभाळून ही मंडळी वगासाठी संहिता लिहिता. स्थानिक व्यासपिठावर नमन सादर करतात. त्याला मोठी गर्दी होते. गिरगांव, दादर मधील मराठी माणुस वसई विरारकडे स्थलांतरीत झाल्यावर या भागातही असे कार्यक्रम होत असतात. Problems of folk artists
आज या लोकलावंताची मागणी आहे की, नाट्यगृहांचे भाडे भरण्यास आम्ही तयार आहोत मात्र नाट्यगृहांनी नमन सादरीकरणासाठी सहकार्य करावे. परंतु या लोककलेला प्राईम टाईममध्ये सादरीकरणासाठी वेळ मिळत नाही. व्यावसायिक नाटकांप्रमाणे भाडे आकारले जात नाही. वेळेची सवलत दिली जात नाही. इतकेच नव्हे तर काही नाट्यगृह संस्था ग्रामीण लोककला म्हणून हिणवतात. याबाबत नमन लोककलावंतांमध्ये चीड आहे.
लोककलेला प्रतिष्ठा मिळावी. या कलेचा प्रचार, प्रसार व्हावा यासाठी नाट्यगृहांनी सहकार्य केले तर नमन लोककला अधिक वृद्धींगत होईल. कलाकारांना उत्पन्नाचे साधन निर्माण होईल. असे कलाकारांना वाटते. Problems of folk artists
लोककलावंतांची ही समस्या सोडविण्यासाठी नमन लोककला संस्थेने पुढाकार घेतला आहे. या संस्थेचे अध्यक्ष रवींद्र मठकर आणि अन्य पदाधिकारी नाट्यसंस्थाचालकांच्या भेटी घेत आहेत. नुकतीच मठकर आणि मंडळींनी गिरगावातील दामोदर नाट्यगृहाच्या संचालकांसोबत बैठक केली. दामोदर नाट्यगृहाने नमन लोककलावंताची मागणी मान्य केली. तसेच नाट्यसंस्थाचालकांच्या संघटनेमध्येही हा विषय मांडण्याची तयारी दर्शवली आहे. Problems of folk artists
लोककलावंताची प्रतिक्रिया
मुंबई आणि उपनगरातील नाट्यसंस्थांनी नमन मंडळांना सहकार्य केले. तेथील प्रयोग यशस्वी झाले तर आपोआप अन्य मोठ्या शहरांमधील नाट्यसंस्थाही सहकार्य करतील. त्यामुळे नमन या पारंपरिक नाट्यकलेचा प्रचार आणि प्रसार होईल.
उदय दणदणे, ठाणे (मुळगाव निवोशी, गुहागर)
लोककलांमधील परंपरेला हवी कलाशिक्षणाची जोड
गणपती उत्सवातील संगीत नाच किंवा जाखडी आज शक्ती तुरा, बाल्या डान्स या नावाने ही लोककला महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. स्वाभाविकपणे या लोककलेमध्ये आधुनिकतेबरोबर कलाशिक्षणाची पध्दत विकसीत झाले. परंतु 10 कोसावर भाषा आणि प्रथेबरोबर नमनाची पध्दती बदलते. शिवाय ही लोककला आजही शिमगोत्सवापुरती मर्यादित राहीली आहे. त्यामुळे कलाशिक्षणाची एकत्रित व्यवस्था उभी राहु शकली नाही. Problems of folk artists
नमन या लोककलेत नृत्य, वादन, गायक, अभिनय यांचा संगम पहायला मिळतो. गणच्या सादरीकरणापुर्वी संकासुरचा नाच होतो. यावेळी खेळ्यांमधील सहकलाकार डोलतात. मध्येच गुडघे किंचित दुमडून उडी घेतात. संकासुर, मृदुंगवादक आणि दोन साथीदार विशिष्ट पध्दतीने तालावर गोल फिरतात. गिरकी घेतात. हे नृत्य मृदुंगाच्या तालावर होते.
गौळणी देखील गाण्यावर नाचतात. यामध्ये सामुहिक सौंदर्य दडलेले आहे. Problems of folk artists
लोककलेची पालखी उमद्या कलाकारांच्या हाती देताना सध्याच्या धावपळीच्या काळात प्रशिक्षण आणि सराव हरवत चालला आहे. त्यामुळे सामुहिकतेमधील सौंदर्य हरवले आहे. तसेच जुन्या लोकगीतांच्या जागी नव्या हिंदी, मराठी चित्रपट संगीतातील चालींची गाणी म्हटली जाऊ लागली आहेत. या बदलांमुळे परंपरेचा ओलावा कमी होतोय. Problems of folk artists
नमनातील भाषेला ग्रामीण लहेजा आहे. त्यांचे सौंदर्यही वेगळेच आहे. परंतु परंपरेने चालत आलेल्या गाण्यांमधील अनेक शब्द आता बदलले आहेत. त्यामुळे या गाण्यांचे गाण्यांचे शुद्धीकरण करणे गरजचे आहे. नृत्य आणि वादनाचा मेळ घालण्यासाठी सरावाबरोबरच अनेक खुबींचा वापर जुनीजाणती मंडळी करायची. सराव नसल्याने हा खुबी नव्या पिढीला माहिती नाहीत. Problems of folk artists
या सर्व गोष्टींचा विचार केला तर प्रत्येक गावातील प्रथा परंपरेप्रमाणे नव्या पिढीला नृत्याचे, वाद्य वाजविण्याचे शास्त्रोक्त पद्धतीने प्रशिक्षण देणे आणि सराव करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर जुनी गाण्याचे संकलन करुन, त्यातील शब्दांचे अर्थबोध लक्षात घेवून हे साहित्य मर्यादित स्वरुपात का होईना प्रकाशित होण्याची गरज आहे. नमन लोककलेच्या विकासासाठी कलाशिक्षणाचे शिवधनुष्य जुन्या जाणत्या मंडळींनी उचलणे गरजेचे आहे. Problems of folk artists
लोककलावंताची प्रतिक्रिया
लोककलेला जगासमोर न्यायचे असेल तर पिढीजात कलागुणांना संस्कार देण्याची गरज आहे. नवोदितांनी केवळ आवड म्हणून या कलेकडे न पहाता, त्यातील बारकावे समजुन घेणे, जुन्या मंडळींकडून शिकुन घेणे आवश्यक आहे. राजहंस नमन मंडळातील कलाकारांना या गोष्टी शिकवल्या जातात. Problems of folk artists जगन्नाथ शिंदे, वरवेली
आमचे 3 Video पाहा.