तवसाळ तांबडवाडी व बाबरवाडी शाळेचे आयोजन
गुहागर, ता. 10 : जि. प. शाळा तवसाळ तांबडवाडी व बाबरवाडी या शाळेचे वार्षिक वनभोजन कार्यक्रम दि. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी संपन्न झाला. या वनभोजन कार्यक्रमात शाळा तवसाळ तांबडवाडी, बाबरवाडी, बालवाडी या शाळांनी सहभाग घेतला होता. Picnic at Tavasal Rohile Beach


या वनभोजन कार्यक्रमाचा आनंद घेत, गाण्याच्या तालावर भेंड्याची जुगलबंदी रंगली, मुलांनी वाळू वरती चित्रे रेखाटली, कबड्डी, खोखो, क्रिकेट, समुद्र लाटांचा आनंद लुटला. शाळा तवसाळ तांबडवाडी चे मुख्याध्यापक अंकुर मोहिते, संदिप भोये, साईनाथ पुजारा, तवसाळ बाबरवाडीचे मुख्याध्यापक प्रमोद साळवी, ज्ञानेश्वर कोकाटे, अंगणवाडी सेविका संगिता सुर्वे यांनी निसर्गाच्या सान्निध्यात उत्तम जेवण बनवून वनभोजनाचा आस्वाद घेतला. शाळेतील जेवण बनवायला आजी श्रीमती सुभद्रा कुरटे आजी सोबत होत्या. Picnic at Tavasal Rohile Beach


तसेच तांबडवाडी महिला मंडळ सौ. प्रेरणा घाणेकर, सौ. हर्षदा निवाते, सौ.मनस्वी घाणेकर, सौ.जागृती पाडवळे, सौ. कविता घाणेकर, सौ.वैजंती थोरसे, सौ. राजश्री कुरटे, सौ. वनिता कुरटे, बाबरवाडी मधील सौ. श्रावणी नाचरे, सौ.संजना हुमणे, सौ.सानिया येद्रे, सौ. स्वरा जोशी, सौ.वनिता येद्रे इत्यादी महिला उपस्थित होत्या. या नियोजनासाठी मा. मुख्याध्यापिका सौ ललिता गोलमडे यांनी शुभेच्छा दिल्या तर सोशल मीडिया प्रसार माध्यम Dj श्री सचिन कुळये यांनीही या वनभोजन कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. Picnic at Tavasal Rohile Beach

