पाते पिलवलीतील घटना, पतीपत्नी जखमी, मुलगा बचावला
गुहागर, ता. 25 : चिपळूण तालुक्यातील पाते पिलवली गव्हाणवाडी येथे रात्री बिबट्या घरात घुसला. उडीचा आवाज ऐकून घरातील महिला जागी झाली. तिने लाईट लावताच बिबट्याची आणि तिची नजरानजर झाली. स्वसंरक्षणार्थ बिबट्याने पतीपत्नीला पंचा मारुन घाबरवले आणि तो स्वयंपाक घरात लपला. याच दरम्यान मुलाला घेवून पतीपत्नी घरातून बाहेर पडेल. ही थरारक घटना रात्री 3.30 च्या सुमारास घडली. सकाळी माळ्यावर लपलेला बिबट्या सर्वांना गुंगारा देत क्षणार्धात जंगलात नाहीसा झाला. A leopard entered the house at night (24th November Night) at Pate Pilvali Gavanwadi in Chiplun taluka. Hearing the sound of jumping, the woman of the house woke up. As soon as she turned on the light, she saw the leopard. In self-defense, the leopard threatened the couple with a punch and hide in the kitchen. Meanwhile, the couple will leave the house with the child. The incident took place around 3.30 am. In the morning (25th November Morning) , the leopard, which was hiding in the home, disappeared in the forest.
24 तारखेला रात्री पाते पिलवली गव्हाणवाडीत तीन वर्षांचा बिबट्या शिरला. कोंबड्या फस्त करण्यासाठी बिबट्या तुकाराम गंगाराम सुवरे (वय 50) यांच्या घराजवळ आला. हे घर एकाबाजुने उघडे होते. कोंबड्या शोधात बिबट्याने घरात उडी मारली. धपकन् काय पडले हे पहाण्यासाठी सुनिता तुकाराम सुवरे (वय 45) यांची माजघरातला लाईट लावला. तेव्हा समोर असलेल्या बिबट्याची आणि त्यांची नजरानजर झाली. बावचळलेल्या बिबट्या सुनिता सुवरेंना पंजा मारुन परत पळून जाण्यासाठी स्वयंपाक घरात गेला. मात्र तिथून बाहेर पडण्यासाठी जागा नसल्याने तो परत माजघरात संदुकीवर येवून बसला. याच कालावधीत सुनिताने आपल्याला मुलाला उठवले. पुन्हा हालचाल झालेली लक्षात येताच बिबट्या तिथल्या कॉटखाली जावून लपला. त्याच कॉटवर सुनिता सुवरेचे मुकबधीर पती तुकाराम गंगाराम सुवरे (वय 50) झोपले होते. आत्तापर्यंत घडलेल्या प्रसंगाची त्यांना माहिती नव्हती. कॉटखाली बिबट्या गेल्यावर सुनिताने तुकाराम सुवरेंना उठवले. कॉट हलल्याने घाबरलेल्या बिबट्याने तुकारामच्या डोक्यात पंजा मारुन पुन्हा स्वयंपाक घरात पळ काढला.
या कालावधीत सुनिता, तुकाराम आणि त्यांचा मुलगा घराबाहेर पडले. आरडा ओरडा करुन ग्रामस्थांना बोलावले. ग्रामस्थांनी जखमी पतीपत्नीला डेरवण येथील रुग्णालयात नेले.
25 तारखेला सकाळी परिक्षेत्र वनाधिकारी राजश्री कीर, उमेश आखाडे परिमंडळ वनाधिकारी सावर्डे, वनरक्षक रानबा बर्बेगेकर, , वनरक्षक दत्ताराम सुर्वे, , वनरक्षक राजाराम शिंदे, गणेश भागाडे, नंदकुमार कदम, सावर्डे पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक धुमाळ, पोलीस पाटील, तलाठी घटनास्थळी पोचले. वनरक्षकांनी घरात शोध घेतला त्यावेळी माळ्यावर बिबट्या लपून बसला असल्याचे लक्षात आले. घराचे दोन्ही दरवाजे आणि खिडक्या उघडून बिबट्याला बाहेर कसे काढायचे याची चर्चा उपस्थित करत होते. तितक्यात बिबट्याने माळ्यावरुन खाली उडीत मारत, मागील दाराने जंगलात पळ काढला.
जखमी पतीपत्नीची प्रकृती उत्तम असल्याचे परिक्षेत्र वनाधिकारी राजश्री कीर यांनी सांगितले आहे.