• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

खोडदे येथे विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू

by Mayuresh Patnakar
January 13, 2021
in Old News
16 0
0
खोडदे येथे विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू
31
SHARES
89
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर : तालुक्यातील खोडदे येथे ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक विहिरीमध्ये पडून बिबट्याचा मृत्यू झाला आहे.मंगळवारी पहाटे सहा वर्षे वयाचा नर जातीचा बिबट्या भक्ष्याचा पाठलाग करताना विहिरीत पडला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच विभागीय वनाधिकारी दीपक खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण परिक्षेत्र वनाधिकारी राजेंद्र पाटील, गुहागर वनपाल संतोष परशेट्ये, रानवी वनरक्षक अरविंद मांडवकर घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थ सतिश पालकर यांनी विहिरीत उतरून ग्रामस्थांच्या सहकार्याने बिबट्याला बाहेर काढले. वनविभागाचे अधिकारी, पोलिस पाटील, सरपंच,तलाठी, ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत पंचनामा करून मृत बिबट्याचे शव विच्छेदनासाठी पशू वैद्यकीय दवाखाना चिपळूण येथे पाठविण्यात आले. भर वस्तीत बिबट्या विहिरीत पडला असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

Tags: ForestGuhagarGuhagar NewsLeopardगुहागर
Share12SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.