गुहागर, ता. 01 : निरनिराळ्या उपक्रमांमध्ये अग्रेसर असणाऱ्या रिगल कॉलेज शृंगारतळी येथे दिनांक 30 डिसेंबर २०२३ रोजी ‘बँकिंग क्षेत्रामधील करियर’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. सदर व्याख्यानासाठी प्रमुख वक्ते म्हणून मा. श्री दीपक कुमार (ब्रांच मॅनेजर, कॅनरा बँक शृंगारतळी) व त्यांचे सहकारी श्री.शिवम सर उपस्थित होते. यावेळी प्रथम रिगल कॉलेज शृंगारतळीचे प्रा. बेर्डे सर यांनी उपस्थित मान्यवरांचे शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले. Lecture on ‘Career in Banking Sector’
श्री. कुमार सर यांनी बँकिंग सेक्टर मध्ये निवड होण्यासाठी आयबीपीएस या संस्थेअंतर्गत होणाऱ्या परीक्षेबद्दल मार्गदर्शन केले. तसेच या परीक्षेसाठी असणारे विषय त्यासाठी असणारे गुण व कालावधी याबद्दल सविस्तर माहिती दिली. बँकिंग परीक्षा जरी अवघड वाटत असल्या तरी मेहनत व चिकाटीच्या जोरावर आपण त्या परीक्षा यशस्वीरित्या पास करू शकतो असे त्यांनी सांगितले. बँकेतील व्यवहार, व्यवस्थापन, बँकेमध्ये असणाऱ्या विविध पोस्ट त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता व डॉक्युमेंटेशन याबद्दल श्री.कुमार यांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले. Lecture on ‘Career in Banking Sector’


आजच्या स्पर्धात्मक विश्वामध्ये टिकण्यासाठी सराव आणि सातत्य असणे गरजेचे आहे असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचेदेखील त्यांनी आपल्या मार्गदरशनांतर्गत निरसन केले. बँकिंग क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी बँकिंगची आवड तसेच उत्तम व्यवहार ज्ञान, बँकिंग क्षेत्रा बद्दलची योग्य माहिती तसेच उत्तम ग्राहक समन्वय आवश्यक आहे, असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. Lecture on ‘Career in Banking Sector’
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.श्री.चोगले सर यांनी केले. या व्याख्यानासाठी रिगल कॉलेज, शृंगारतळीचे सर्व विद्यार्थी व शिक्षकवर्ग उपस्थित होते. रिगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा.श्री. संजयराव शिर्के संचालिका डॉ.सुमिता शिर्के व रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राचार्य सौ रेश्मा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या व्याख्यानाच्या आयोजन करण्यात आले होते. Lecture on ‘Career in Banking Sector’