• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

शृंगारतळी येथे ‘बँकिंग क्षेत्रामध्ये करियर’ विषयावर व्याख्यान

by Ganesh Dhanawade
January 1, 2024
in Guhagar
66 1
0
Lecture on 'Career in Banking Sector'
131
SHARES
373
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 01 : निरनिराळ्या उपक्रमांमध्ये अग्रेसर असणाऱ्या रिगल कॉलेज शृंगारतळी येथे दिनांक 30 डिसेंबर २०२३ रोजी ‘बँकिंग क्षेत्रामधील करियर’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. सदर व्याख्यानासाठी प्रमुख वक्ते म्हणून मा. श्री दीपक कुमार (ब्रांच मॅनेजर, कॅनरा बँक शृंगारतळी) व त्यांचे सहकारी श्री.शिवम सर उपस्थित होते.  यावेळी प्रथम रिगल कॉलेज शृंगारतळीचे प्रा. बेर्डे सर यांनी उपस्थित मान्यवरांचे शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले. Lecture on ‘Career in Banking Sector’

श्री. कुमार सर यांनी बँकिंग सेक्टर मध्ये निवड होण्यासाठी आयबीपीएस या संस्थेअंतर्गत होणाऱ्या परीक्षेबद्दल मार्गदर्शन केले. तसेच या परीक्षेसाठी असणारे विषय त्यासाठी असणारे गुण व कालावधी याबद्दल सविस्तर माहिती दिली. बँकिंग परीक्षा जरी अवघड वाटत असल्या तरी मेहनत व चिकाटीच्या जोरावर आपण त्या परीक्षा यशस्वीरित्या पास करू शकतो असे त्यांनी सांगितले. बँकेतील व्यवहार, व्यवस्थापन, बँकेमध्ये असणाऱ्या विविध पोस्ट त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता व डॉक्युमेंटेशन याबद्दल श्री.कुमार यांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले. Lecture on ‘Career in Banking Sector’

आजच्या स्पर्धात्मक विश्वामध्ये टिकण्यासाठी सराव आणि सातत्य असणे गरजेचे आहे असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचेदेखील त्यांनी आपल्या मार्गदरशनांतर्गत निरसन केले. बँकिंग क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी बँकिंगची आवड तसेच उत्तम व्यवहार ज्ञान, बँकिंग क्षेत्रा बद्दलची योग्य माहिती तसेच उत्तम ग्राहक समन्वय आवश्यक आहे, असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. Lecture on ‘Career in Banking Sector’

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.श्री.चोगले सर यांनी केले. या व्याख्यानासाठी रिगल कॉलेज, शृंगारतळीचे सर्व विद्यार्थी व शिक्षकवर्ग उपस्थित होते. रिगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा.श्री. संजयराव शिर्के संचालिका डॉ.सुमिता शिर्के व रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राचार्य सौ रेश्मा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या व्याख्यानाच्या आयोजन करण्यात आले होते. Lecture on ‘Career in Banking Sector’

Tags: Lecture on 'Career in Banking Sector'
Share52SendTweet33
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.