• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
17 May 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

by Manoj Bavdhankar
January 12, 2024
in Guhagar
168 1
1
Inauguration of Tribute Cup Cricket Tournament
329
SHARES
940
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 12 : शहरातील कन्हैया स्टार क्रीडा मंडळ गुहागर खालचा पाट यांच्या वतीने कै .नरेश (नऱ्या भाऊ) वराडकर व कै. (नरेंद्र दादा) वराडकर श्रद्धांजली चषक 2024 टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन खालचापाट गावचे रहिवासी शोधन वराडकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. फित अशोक गोयथळे यांच्या हस्ते तर पहिल्या सामन्याचे नाणेफेक समीर आरेकर यांनी केले. सदर स्पर्धा ही 12 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीत पार पडणार आहे. Inauguration of Tribute Cup Cricket Tournament

या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक 25000/- रुपये व चषक, द्वितीय क्रमांक पंधरा हजार रुपये व आकर्षक चषक देऊन गौरवण्यात येणार आहे. तर वैयक्तिक मध्ये उत्कृष्ट फलंदाज चषक व बॅट, उत्कृष्ट गोलंदाज चषक व शूज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक चषक व गॉगल तर स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू याला चषक, बॅट, कॅप ,ट्रॅक सूट शूज देण्यात येणार आहे. तर अंतिम सामन्यातील सामनावीर चषक व स्मार्ट वॉच देण्यात येणार आहे. या स्पर्धेची प्रवेश फी दोन हजार रुपये अशी ठेवण्यात आली आहे. Inauguration of Tribute Cup Cricket Tournament

या उद्घाटन कार्यक्रमाला दिगंबर गोयथळे, दिलीप गोयथळे, मंदार गोयथळे, अनिकेत वराडकर, पराग भोसले, शोधन वराडकर, अशोक गोयथळे, सिद्धार्थ वराडकर, आर्यन वराडकर, तेजस वराडकर, रुपेश पाटील, मनीष गोयथळे, श्रीरंग वराडकर, केदार वराडकर, समीर आरेकर आदी उपस्थित होते. Inauguration of Tribute Cup Cricket Tournament

Tags: Inauguration of Tribute Cup Cricket Tournament
Share132SendTweet82
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.