• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
18 June 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

खा. तटकरे यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रवादीत सक्रीय होणार !

by Mayuresh Patnakar
November 7, 2020
in Old News
16 0
0
राजेश बेंडल राष्ट्रवादीत सक्रिय तर प्रदिप बेंडल यांचा पक्षप्रवेश
32
SHARES
91
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

राजेश बेंडल : शहर विकास आघाडीचे अस्तित्व अबाधित

गुहागर : मी आजही राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. मध्यंतरीच्या काळात पक्षापासून लांब होतो, पक्षासोबत असलेली नाळ कधीच तुटली नव्हती. खासदार सुनील तटकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पक्षात सक्रिय होण्याच्या प्रक्रिया पूर्ण करून योग्यवेळी योग्य निर्णय घेऊन पक्षात सक्रियपणे काम करण्याचे संकेत गुहागरचे नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी दिले आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय झाल्यानंतरही शहर विकास आघाडीचे अस्तित्व यापुढेहि अबाधित ठेवणार असल्याचे समजते.
शुक्रवारी गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी नगराध्यक्ष राजेश बेंडल गेले होते. पक्षाचा जुना कार्यकर्ता या नात्याने आणि नगराध्यक्ष म्हणून त्यांचे स्वागत करण्यात आले. या बैठकीत नगराध्यक्ष बेंडल यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून आपल्या भावना व्यक्त केल्या. मुळातच राष्ट्रवादीचा राजीनामा दिला नसल्याने मी पुन्हा पक्ष प्रवेश करण्याचा प्रश्न उद्भवत नसल्याचे त्यांनी सांगितले. आपण लवकरच गुहागर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी खासदार सुनील तटकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सक्रिय होण्याच्या प्रक्रिया पूर्ण करून योग्यवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रियपणे काम करणार आहेत.
दरम्यान, त्यांच्या समवेत इंदिरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप बेंडल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून ते देखील नगराध्यक्ष बेंडल यांच्या साथीने खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रवादीत सक्रिय होणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. त्यामुळे गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसला बेंडल यांच्या रूपाने एका अर्थाने मोठे बळ मिळणार आहे

Tags: GuhagarGuhagar NewsNCPगुहागरगुहागर न्युजमराठी बातम्या
Share13SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.