• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
13 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

झाकीर हुसैन यांना ‘उस्ताद’ म्हटलेलं का आवडत नसे

by Guhagar News
December 18, 2024
in Sports
241 3
0
Famous tabla player Zakir Hussain
474
SHARES
1.4k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

“मै जिंदगीभर शागीर्द रहना चाहता हूँ” असं ते का म्हणाले होते?

गुहागर, ता. 18 : सुप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन यांनी अमेरिकेतल्या सॅन फ्रॅन्सिस्कोमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने तबला पोरका झाला आहे. कारण जागतिक स्तरावर तबला पोहचवण्याचं काम झाकीर हुसैन यांनी केलं. वयाच्या सातव्या वर्षापासून तबला वादन या कलेची सुरु केलेली साधना रविवारी म्हणजेच १५ डिसेंबर २०२४ या दिवशी शांत झाली. झाकीर हुसैन म्हटलं की वाह उस्ताद वाह! या त्यांच्या ओळी आपसूकच आपल्यालाही आठवतात. मात्र हे ते त्यांच्या वडिलांना (अल्लाह राखा) उद्देशून म्हणाले होते. प्रत्यक्षात झाकीर हुसैन यांना ‘उस्ताद’ असं म्हटलेलं मुळीच आवडत नसे. त्यामागचं कारणही तसंच खास होतं. Famous tabla player Zakir Hussain

मुंबईत लहानाचे मोठे झाले झाकीर हुसैन

मुंबईत मी लहानाचा मोठा झालो, मी प्रत्येक प्रकारचं संगीत ऐकलं. माझे वडील अल्लाह राखा खान हे जगभर फिरत असत आणि वेगवेगळ्या प्रकारचं संगीत मला ऐकवत असत. कमी वयातच मला खूप चांगल्या चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या, ऐकायला मिळाल्या, अनुभवता आल्या. त्यामुळे मी भारतच नाही तर जगातल्या लोकांसह काम करण्यास सक्षम झालो असं झाकीर हुसैन यांनी म्हटलं होतं. मला जगभरात काम करता आलं याचं श्रेय हे माझ्या वडिलांचं (अल्लाह राखा खान) यांचं आहे. वयाच्या १२ व्या वर्षी मी बडे गुलाम अली, आमीर खाँ, ओंकारनाथ ठाकूर यांची साथसंगत करायचो. वयाच्या १६ व्या-१७ व्या वर्षी मी पंडित रविशंकर, अली अकबर खान यांच्यासाठी तबला वादन केलं आहे. त्यामुळे मला लहान वयातच खूप मोठमोठ्या लोकांसह काम करण्याची संधी मिळाली असंही झाकीर हुसैन यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं. Famous tabla player Zakir Hussain

वडिलांचा प्रभाव सर्वाधिक होता

झाकीर हुसैन यांनी याच मुलाखतीत हे सांगितलं होतं की माझ्यावर सर्वाधिक प्रभाव होता तो त्यांच्या वडिलांचा. म्हणजेच उस्ताद अल्ला राखा खान यांचा. तबला वादनाचं सुरुवातीचं प्रशिक्षण झाकीर हुसैन यांना त्यांच्या वडिलांनीच दिलं. तबला कसा वाजवायचा? हात किंवा थाप कशी मारायची, वाद्यांशी समतोल कसा साधायचा? हे सगळं मला माझ्या वडिलांनी शिकवलं होतं. त्यानंतर आपण वेगवेगळ्या ठिकाणी तबला वादन करु लागलो. इतर तबला वादकांना ऐकलं तेव्हा त्यातूनही प्रेरणा मिळाली असंही झाकीर हुसैन यांनी सांगितलं होतं. Famous tabla player Zakir Hussain

दुसरं वाद्य वाजवण्याचा विचार कधीच आला नाही – हुसैन

झाकीर हुसैन यांनी याच मुलाखतीत सांगितलं की त्यांना दुसरं वाद्य निवडण्याचा प्रश्नच कधी मनात आला नाही. ते म्हणाले होते, “लहानपणी अनेकवेळा रियाज केल्यानंतर मी झोपत असे तेव्हाही तबला माझ्याबरोबर असायचा. दुसरं वाद्य वाजवावं असा विचार मनात कधीच आला नाही. माझ्या वडिलांनी काही दिवस मला पियानो शिकण्यासाठी पाठवलं होतं. कदाचित पाश्चात्य संगीताबाबत मला थोडी माहिती व्हावी असा त्यांचा हेतू असावा. त्यामुळे मी पियानो आणि गिटारही वाजवलं. सतारही वाजवून पाहिली. कॅलिफोर्नियातील अली अकबर खान साहेब स्कूलमध्ये शिकत होतो. जेव्हा ते सरोदचा वर्ग घेत. त्यावेळी मीही पाठीमागे बसून काही टन-टन-टन वाजवायचो. पण माझा ओढा हा तबल्याकडेच सर्वाधिक राहिला. दुसऱ्या कोणत्या वाद्याकडे माझं लक्ष गेलं नाही.” याच मुलाखतीत आपल्याला उस्ताद म्हटलेलं आवडत नाही हे देखील झाकीर हुसैन म्हणाले होते. Famous tabla player Zakir Hussain

मै हमेशा शागीर्द रहना चाहता हूँ

या मुलाखतीत जेव्हा त्यांना तुम्ही स्वतःचं वर्णन कसं कराल हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा झाकीर हुसैन म्हणाले होते, “मला स्वतःला शागीर्द (शिष्य) म्हणून घ्यायलाच आवडेल. कारण मी रोज काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतो. माझे वडीलही मला म्हणायचे की बेटा उस्ताद होण्याचा प्रयत्न करु नकोस, चांगला शागीर्द हो. खूप काही शिकशील. मी रोज घरातून बाहेर पडतो तेव्हा मला माहीत असतं की मी आज काहीतरी नवीन शिकणार आहे.” असं झाकीर हुसैन यांनी म्हटलं होतं. याच कारणामुळे त्यांना कधीही उस्ताद म्हटलं गेलं नाही. Famous tabla player Zakir Hussain

Tags: Famous tabla player Zakir Hussain
Share190SendTweet119
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.