• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
18 July 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कोकणासाठी जादा बसेस सोडणार

by Guhagar News
June 25, 2026
in Old News
109 1
0
Extra buses to be run for Konkan
214
SHARES
611
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

परिवहन मंत्र्यांचे आमदार जाधव यांना आश्वासन

गुहागर, ता. 25 : गुहागर मतदारसंघातील एसटी आगारांना नवीन बसेस दिलेल्या आहेत. तुम्ही बसेस मागून थकाल पण मी बस देऊन थकणार नाही अशी व्यवस्था केली आहे. खासगी बसवर नियंत्रण आणण्याचे काम भविष्यात आम्हाला करावे लागेल. ज्या ठिकाणी एसटी बसेसची गरज असेल त्या ठिकाणी मागणी करा. तुमची जादा बसेसची मागणी गणपतीच्या पूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासन परिवहन मंत्र्यांनी दिले.  Extra buses to be run for Konkan

कोकणात गणपती व शिमगा हे दोन मोठे सण आहेत. या सणांसाठी मोठ्या प्रमाणावर खासगी बसेस सुटतात. आता गणपती उत्सव येत आहे, पण जादा भाडे घेऊन भाविकांची व कोकणवासीयांची होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी वेळीच दखल घेण्याची मागणी शिवसेनेचे विधानसभेतील गटनेते भास्कर जाधव यांनी केली असता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, एसटी महामंडळाने ८ हजार ३०० बसेस घेतल्या आहेत. पश्चिम आणि पूर्व उपनगरातून सणासुदीला आणि दररोज असंख्य एसटी व खासगी बसेस मुंबईच्या बाहेर रवाना होतात, पण यामुळे महामार्गावर वाहतूककोंडी निर्माण होते. त्यामुळे महामार्गावरील सार्वजनिक बांधकाम विभाग व एमएमआरडीच्या जागा घेऊन प्रवासी बसेससाठी थांबे बांधण्यात येणार आहेत. Extra buses to be run for Konkan

विधानसभेत एसटी महामंडळाच्या प्रश्नावरील चर्चेत भाग घेताना सुनील प्रभू यांनी प्रवासी बसेसमुळे महामार्गावर होणाऱ्या वाहतूककोंडीकडे परिवहन विभागाचे लक्ष वेधले. पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्गावर या बसेसना थांबण्यासाठी काही ठराविक ठिकाणी थांब्याची व्यवस्था केली तर महामार्गावरील वाहतूककोंडी दूर होईल. त्याची योजना तयार केली तर मुंबईच्या महामार्गावर वाहतूककोंडी दूर होईल आणि प्रवाशांना दिलासा मिळेल. कोकणात जाणाऱ्या गाड्या दहिसरमधून जातात. तिथे सार्वजनिक बांधकाम विभागाची जागा आहे. एमएमआरडीएची जागा आहे. ती जागा एसटी महामंडळासाठी मिळवून घेतली आणि त्या ठिकाणी या बसेस उभ्या केल्या तर महामार्गावरील वाहतूककोंडी दूर होईल. यासाठी परिवहन विभागाने प्रयत्न करावेत, अशी सूचना सुनील प्रभू यांनी केली. Extra buses to be run for Konkan

Share86SendTweet54
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.