• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
12 September 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गणेशोत्सवासाठी गुहागरमधून १७३ एसटी फुल्ल

by Mayuresh Patnakar
September 3, 2026
in Guhagar
213 3
0
Free bus service for Ganeshotsav
419
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

बाहेरील आगारातून ३५० बसेस मागवणार

गुहागर, ता. 03 : गणेशोत्सवासाठी येथील आगारामधून २० दिवस अगोदरच १७३ गाड्यांचे आरक्षण झाले आहे. गतवर्षाच्या तुलनेत यावर्षी वाढ होण्याची शक्यता असून ४०० पेक्षा जादा गाड्या बुकिंग होण्याचा अंदाज आगार व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे. External buses will be called for Ganeshotsav

कोकणात येणाऱ्या चाकरमानांसाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. वाडीवस्तीवर येणाऱ्या चाकरमान्यांची बुकिंगची लगबग सुरू आहे. याबाबात माहिती देताना वाहतूक नियंत्रक स्वप्नील शिंदे यांनी सांगितले की, १९ ते २१ सप्टेंबर या कालावधीसाठी आगाराने विरार, बोरिवली, भांडुप, चिंचवड, विठ्ठलवाडी, कल्याण, स्वारगेट या मार्गावर जादा बस सेवा दिली आहे. ३५ गाड्यांचे आगाऊ आरक्षण झाले आहे, तर १३३ गाड्यांचे ग्रुप बुकिंग झाले आहे. आगारामध्ये एकूण ६१ गाड्या आहेत. यामध्ये लांब पल्ल्त्याकरिता १५ गाड्या चांगल्या गुणवत्तेच्या आहेत. आगारासाठी मिळालेल्या दहा नवीन गाड्यांमुळे लांब पल्ल्यासाठी या गणेशोत्सवामध्ये अधिक फायद्याच्या ठरणार आहेत. External buses will be called for Ganeshotsav

गतवर्षी ३७३ गाड्यांचे बुकिंग झाले होते त्या तुलनेत यावर्षी जादा बुकिंग होण्याची शक्यता आहे. यामुळे ४०० पेक्षा जादा गाड्या बुकिंग होतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. आगारासाठी लागणाऱ्या गाड्यांची व्यवस्था वरिष्ठ पातळीवरून सुरू असून गतवर्षी ३५० जादा गाड्या लागल्या होत्या. त्याचप्रमाणेच यावर्षीही यापेक्षाही जादा गाड्या लागण्याची शक्यता आहे. प्रवाशांनी व चाकरमान्यांनी वेळेत एसटी महामंडळाचे गाड्या बुकिंग कराव्या, असे आवाहन केले आहे. External buses will be called for Ganeshotsav

Tags: External buses will be called for Ganeshotsav
Share168SendTweet105
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.