दीपक परचुरे यांच्या उपोषणाची प्रांताधिकाऱ्यांकडून दखल
गुहागर, ता. 30 : गुहागर- चिपळूण-कराड – विजापूर महामार्गावरील गुहागर दरम्यान, रस्ता रुंदीकरणाचे काम रखडल्याने व भूसंपादन मोबदल्याची
कार्यवाही न झाल्याने गुहागर येथील दीपक परचुरे यांनी प्रजासत्ताक दिनापासून साखळी उपोषण सुरु केले होते. मात्र, चिपळूण प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी रखडलेल्या भूसंपादनाचा निवाडा व मोबदल्याबाबत एक महिन्यात कार्यवाही होणार असल्याचे लेखी आश्वासन दिल्याने हे उपोषण स्थगित केले आहे. Deepak Parchure’s hunger strike suspended


गुहागर-विजापूर महामार्गावरील गुहागर ० कि.मी. ते १.८०० कि.मी. पर्यंतच्या रस्त्याचे काम सुरु नसल्यामुळे व मोडकाआगर पूल ते मोडकाआगर तिठा येथील कोणत्याही कामाला आजपर्यंत सुरुवात नसल्याने ग्रामस्थांसह तहसिल कार्यालय, गुहागर येथे उपोषणाला बसणार असल्याचे पत्र दीपक परचुरे यांनी प्रांताधिकाऱ्यांना दिले होते. प्रांताधिकाऱ्यांनी याची दखल घेत गुहागर तालुक्यातील ९ गावांचे भूसंपादन निवाडा तयार करण्याची कार्यवाही सुरु असून एक महिन्यात निवाडा मान्यतेसाठी कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग रत्नागिरी यांच्या कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. तसेच निवाड्यास मान्यता प्राप्त होताच भूसंपादन मोबदला रक्कम वाटप करण्याची तजवीज असल्याचे पत्राद्वारे कळविले आहे. Deepak Parchure’s hunger strike suspended
दरम्यान, हे पत्र मिळताच परचुरे यांनी प्रांताधिकाऱ्यांना पत्र पाठवून पालकमंत्री उदय सामंत, सिंधूरत्न योजनेचे संचालक किरण सामंत, माजी खा. निलेश राणे व भाजपा जिल्हाध्यक्ष केदार साठे यांच्या विनंतीचा मान ठेवून बेमुदत उपोषण स्थगित करत असल्याचे कळवले. Deepak Parchure’s hunger strike suspended