गुहागर : तालुक्यातील पाटपन्हाळे महाविद्यालयात शिक्षण घेत असलेली १४ वर्षीय विद्यार्थिनी बेपत्ता असल्याची नोंद गुहागर पोलिस स्थानकात करण्यात आले आहे.
तालुक्यातील कुटगीरी येथील १४ वर्षीय विद्यार्थिनी ही न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे येथे इयत्ता अकरावी कॉमर्स शाखेत शिक्षण घेत होती. मंगळवार दि. ५ जानेवारी रोजी नेहमीप्रमाणे ७.४५ वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे महाविद्यालय जाते असे सांगून घराबाहेर पडली होती. दुपारी १२ वाजेपर्यंत घरी आली नाही म्हणून कॉलेजमध्ये जाऊन शिक्षकांकडे चौकशी केली असता ती कॉलेजमध्ये आली नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर मैत्रिणी व नातेवाईकांकडे चौकशी केली असता त्या ठिकाणीहि मिळून आली नाही. मुलीला अज्ञात इसमाने पळवून नेले असावी अशी तक्रार तिच्या वडिलांनी पोलिस स्थानकात केली आहे.