विदर्भ कोकण बँकेच्या वेलदूर शाखेत ठेवले होते नकली दागिने
गुहागर,ता. 25 : सोन्याचे खोटे दागिने गहाण ठेवून वेलदूर येथील विदर्भ ग्रामीण बँकेची नऊजणांनी 14 लाख 63 हजार 703 रुपयांची फसवणूक केली होती. या प्रकरणी पोलीसांनी गुहागर, नवानगर, वेलदूर, असगोली या चार गावातील सात जणांना अटक केली. यामध्ये तिन महिलांचा समावेश आहे. दरम्यान याच प्रकरणात पूर्वी अटक केलेल्या एका आरोपीला जामिन मंजूर झाला आहे. तर एक आरोपी खुनाच्या गुन्हात अटकेत आहे.
वेलदूरच्या विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत सोन्याचे खोटे दागिने ठेवून आठजणांनी 14 लाख 63 हजार 703 रुपयांची फसवणूक केली. अशी तक्रार विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा वेलदूरचे व्यवस्थापक मकरंद पत्की यांनी 13 नोव्हेंबर 2020 ला गुहागर पोलीस ठाण्यात केली होती. त्यामध्ये 8 जणांसह बँकेचे सोनाराचा समावेश आहे. या 8 जणांमधील मनोहर महादेव घुमे रा. असगोली, गणेश शंकर कोळथरकर रा. नवानगर, श्रीमती सुलोचना दत्ताराम पावसकर, शबीया उमरखान परबुलकर रा. नवानगर, विक्रांत महादेव दाभोळकर रा. वेलदूर, राजेश गोपिनाथ भोसले रा. खालचापाट, श्रीमती विनया वसंत दाभोळकर रा. वेलदूर या सहा जणांना पोलीस उपनिरिक्षक जाधव यांनी सोमवारी (ता. 25) सकाळी 11 वा. अटक केली आहे. या प्रकरणातील एक आरोपी मिलिंद मदन जाधव रा. तरीबंदर याला यापूर्वीच अटक करण्यात आली होती. त्याची कोर्टाने जामिनावर सुटका केली आहे.