नशिब बलवत्तर म्हणून प्राण वाचले, वाहनाचे नुकसान
गुहागर, ता. 23 : शृंगारतळीकडून गुहागरकडे येणाऱ्या डंपर आणि चार चाकी यांचा पाटपन्हाळे येथील पुलावर अपघात झाला. पुलाचे काम अर्धवट असल्याने डंपरने वेग कमी केला. डंपर मागून येणाऱ्या भरधाव वाहनाला अचानक कार थांबवता आली नाही. हे वाहन डंपरच्या खाली घुसले. सुदैवाने या वाहनातील प्रवाशांना केवळ किरकोळ दुखापत झाली. मात्र या अपघातात चारचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात 22 नोव्हेंबरला सायंकाळी झाला. A Dumper and a small vehicle coming from Sringartali to Guhagar met with an accident on the bridge at Patpanhale. The dumper slowed down as the bridge work was incomplete. The vehicle coming from behind the dumper could not stop the car suddenly. The vehicle rammed under the dumper. Fortunately, the passengers in the vehicle sustained only minor injuries. However, the vehicle was severely damaged in the accident. The accident happened on the evening of November 22nd. (Accident on Highway)


हा अपघात 22 नोव्हेंबरला सायंकाळी 3.45 च्या दरम्यान झाला. श्रृंगारतळीकडून गुहागरच्या दिशेने सुभानअल्ला ट्रान्सपोर्ट कंपनीचा डंपर येत होता. या डंपर मागे मुंबई विले पार्ले येथून गुहागर वरचापाट दुर्गादेवीवाडीमधील शांताराम जांगळी यांच्या घराकडे जाणारे चारचाकी होती. ही गाडी अभिजीत रमेश मुरमुरे चालवत होते. उतार असल्याने गाडी वेगात होती. पाटपन्हाळे पुलाजवळ डंपर चालकाने गाडीची गती कमी केली. रस्ता नवीन असलेल्या अभिजीतला चटकन गती कमी करणे जमले नाही. त्यामुळे सदर वाहन थेट डंपरच्या खाली गेले. ही धडक इतकी जोरदार होती की, डंपरचा मागचा भाग वाहन चेपत चालकापर्यंत आला. चार चाकीची पुढची काच तुटली. बॉनेटचा पत्रा कागदाप्रमाणे चुरगळा गेला. डंपरच्या मागील फाळक्याचा एक दांडा चारचाकीच्या पत्र्यात अडकला.


या चारचाकी वाहनात चालकासह 1 पुरुष व 2 महिला होत्या. सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. समोर बसलेला चालक आणि पुरुष यांच्या डोक्याला किरकोळ माल लागला. अपघात झाल्याचे कळताच आजुबाजुच्या परिसरातील ग्रामस्थ तेथे जमा झाले. त्यांनी अडकलेली दोन्ही वाहने मोकळी केली. अपघात गंभीर असला तरी कोणालाच दुखापत झालेली नसल्याने सर्वांनी सुटकेचा श्र्वास सोडला.

