गुहागर नगरपंचायत : पाणी समितीला पदसिध्द सभापती मिळाले
गुहागर, ता. 24 : नगरपंचायतीमधील सभापती पदांच्या रिक्त जागी नेमणूक करण्यासाठी आज निवडणूक होती. मात्र पुन्हा एकदा पुरेशा संख्याबळाअभावी महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतींची निवड होवू शकली नाही. 23 तारखेला उपनगराध्यक्ष पदाची निवड झाल्याने पाणी समितीला सभापती मिळाला. Elections were held today to fill the vacancies in the Guhagar Nagar Panchayat. However, once again, due to lack of sufficient number, the chairperson of the Women and Child Welfare Committee could not be elected. On the 23rd, after being elected as the Deputy Mayor, the Water Committee got a Chairman. (chairperson Election)


गुहागर नगरपंचायतीमध्ये उपनगराध्यक्ष हे पाणी पुरवठा, जल:निस्सारण नियोजन आणि विकास समितीचे पदसिध्द सभापती असल्याचे निश्चित करण्यात आले आहे. उपनगराध्यक्ष पदी 23 नोव्हेंबरला सौ. प्रणिता प्रविण साटले यांनी निवड झाली. त्यामुळे या समितीचे सभापती पद सौ. प्रणिता साटले यांना मिळाले. या समितीच्या सदस्यांची निवड 4 ऑक्टोबरलाच करण्यात आली होती. त्याप्रमाणे पाणी समितीमध्ये अमोल प्रताप गोयथळे, माधव तुकाराम साटले, उमेश अनंत भोसले आणि अरूण गोविंद रहाटे हे नगरसेवक आहेत.


महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदासाठी शहर विकास आघाडीची आजही कोंडी झाली. भाजपने सत्तेत सहभागी होण्याची भूमिका घेतल्याने या सभापती पदाचे नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी 1 नगरसेवक कमी पडला. ४ ऑक्टोबरचीच स्थिती आजही तशीच राहीली. त्यामुळे महिला व बालकल्याण समितीचा कारभार सभापती विना चालविण्याची वेळ शहर विकास आघाडीवर आली आहे. या समितीच्या सदस्य पदी सौ. मनाली महेश सांगळे, सौ. स्नेहल सुनिल रेवाळे, सौ. मृणाल राजेश गोयथळे आणि सौ. भाग्यलक्ष्मी महेश कानडे यांनी निवड 4 ऑक्टोबरलाच करण्यात आली आहे.

