रत्नागिरी गॅस विरोधात सहा दिवस सुरु आहेत निदर्शने
गुहागर, ता. 22 : तालुक्यातील अंजनवेल, वेलदूर आणि रानवी ग्रामपंचायतींचा इमारत व जमीन कर देण्यास रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्पाने नकार दिला आहे. यासंदर्भात चर्चा करुन मार्ग काढण्याची विनंती ग्रामपंचायतींनी केली होती. मात्र कंपनी व्यवस्थापनाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे 17 नोव्हेंबरपासून दररोज सकाळी दिड तास तीन्ही ग्रामपंचायतींमधील ग्रामस्थ कंपनीसमोर निदर्शने करत आहेत. Ratnagiri Gas and Power Project (RGPPL) has refused to pay building and land tax of Anjanvel, Veldur and Ranvi Gram Panchayats. The gram panchayat had requested to find a way out by discussing the matter. But the company management ignored it. Therefore, villagers from all the three Gram Panchayats have been protesting in front of the company for one and a half hours every morning since November 17.(Protest against RGPPL)


अंजनवेल, वेलदूर, रानवी ग्रामस्थांच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी भाजपचे (BJP) उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष किरण खरे, तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे, भाजयुमो तालुकाध्यक्ष संजय मालप, सोशल मिडिया जिल्हा संयोजन शार्दुल भावे आज निदर्शनांमध्ये सहभाग घेतला.


याबाबत बोलताना अंजनवेल, वेलदूर रानवी प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष आणि अंजनवेल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच यशवंत बाईत म्हणाले की, आरजीपीपीएल कडून तीन्ही ग्रामपंचायतीना लाखोंचा इमारत व जमीन कर मिळतो. या ग्रामनिधीमधुन ग्रामपंचायतीनी पायाभूत सुविधांची निर्मिती आणि देखभालीचे नियोजन केले आहे. जर कंपनीने हा कर दिला नाही तर ग्रामपंचायतींचे नियोजन कोलमडेल. अनेक उपक्रम बंद पडतील. बेरोजगारीची समस्या निर्माण होईल.

