• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
25 August 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर येथे “श्रावण भजन महोत्सव २०२६ ” संपन्न

by Guhagar News
August 24, 2026
in Old News
83 1
0
Shravan Bhajan Festival
163
SHARES
465
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ गुहागर तालुका तर्फे आयोजन

गुहागर, ता. 24 : अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ (महा.) रजि. नोंदणी क्रमांक: रजि. बृहन्मुंबई/संलग्न अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ गुहागर तालुका आयोजित “श्रावण भजन महोत्सव २०२६” चे आयोजन भंडारी भवन, गुहागर किर्तनवाडी रोड येथे करण्यात आले होते. सकाळी भंडारी भवन पटांगण येथे रिंगण सोहळा पार पडला. त्यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटन सोहळा पार पडला. Shravan Bhajan Festival

या कार्यक्रमासाठी गुहागर पंचायत समिती सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे, गुहागर नगराध्यक्ष निता मालप, जिल्हा परिषद सदस्य नेत्राताई ठाकूर, चंद्रभागा गॅस एजन्सीच्या मालक संगीता हळदणकर/भाटकर, नगरसेवक व कलाकार मानधन समिती सदस्य अमरदीप परचुरे, नगरसेविका श्रिया मोरे, अमोल गोयथळे, सुजित साटले, अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ महाराष्ट्र अध्यक्ष बुवा भगवान लोकरे, सचिव बुवा प्रमोद हर्याण, बुवा श्रीधर मुणगेकर, अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ गुहागर तालुकाध्यक्ष सागर मोरे, सचिव संदेश हुमणे, राज विखारे, नगरसेवक सौरभ भागडे, विदिशा दणदणे, सामाजिक कार्यकर्ते निलेश मोरे , बुवा जनार्दन पेडणेकर,बुवा दत्तात्रय कारेकर, बुवा ज्ञानेश्वर सावंत ,बुवा अनंत सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. Shravan Bhajan Festival

मंडळाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भजन सम्राट बुवा भगवान लोकरे, बुवा श्रीधर मुणगेकर, बुवा प्रमोद हर्याण यांचा सभापती व उपसभापती यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना सभापती प्रणव पोळेकर यांनी सांगितले की, भजन कला आजही प्रत्येक गावामध्ये चांगल्या प्रकारे टिकून ठेवली आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे, हिच भजन परंपरा आजही तालुक्यातील तरुणानी टिकवून ठेवली आहे. काळ बदलला तशी परंपरा देखील बदलत चालले आहे, परंतु नामवंत भजनी बुवांची भजने आजही लोकप्रिय होत आहेत. भजनामधील सुप्रसिद्ध अभंग असलेले..” भुंकणारे भुंकू दे…नको त्यांचा संग …आम्ही आम्ही आम्ही भजनात दंग… या अभंगाचा संदर्भ देताना प्रणव पोळेकर म्हणाले की, राजकारणामध्ये टीकाटिप्पणी कायम सुरू असतात, भजनामध्ये यावर उपरोधिक गीतेही असतात, अभंग व गीतातून त्याला प्रत्युत्तरही दिले जाते, आमच्यावरही देखील टीका होत असते… आमच्यावर भुंकणारे यांच्यावर आम्ही दुर्लक्ष करत असतो… आधी माझ्यावर कुणी टीका केली तर हा अभंग गातो आणि निवांत झोपतो… या सन्मान सोहळ्याला बोलविल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो.. जी काही मदत लागेल ती देण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन असे आश्वासन दिले. Shravan Bhajan Festival

यावेळी गुहागर तालुक्यातील भजन मंडळांनी भजन सादरीकरण केले. दुपारनंतर बुवा श्रीधर मुणगेकर, बुवा भगवान लोकरे, बुवा प्रमोद हर्याण व इतर मान्यवरांचा गायन कार्यक्रम संपन्न झाला. सायं. भजन सम्राट बुवा भगवान लोकरे, बुवा श्रीधर मुणगेकर,बुवा प्रमोद हर्याण या त्रिमुर्तीचा अमृत महोत्सव वाढदिवस सोहळा साजरा करण्यात आला. सायं. भैरवीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमासाठी अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ गुहागर तालुका तसेच गुहागर तालुक्यातील सर्व भजनीबुवा व भजनी प्रेमी यांनी सहकार्य केले. Shravan Bhajan Festival

Share65SendTweet41
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.