• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 December 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

व्याडेश्र्वर महोत्सवात बँकेचा स्टॉल

by Mayuresh Patnakar
March 9, 2024
in Guhagar
129 1
0
Bank Stall at Vyadeshwar Mahotsav
253
SHARES
722
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 09 : गुहागरात होणाऱ्या व्याडेश्र्वर महोत्सवात चिपळूण अर्बन बँकेचा (Chiplun Urban Bank) स्टॉल लावण्यात आला आहे. या स्टॉलवर बँकेच्या विविध योजनांची माहिती ग्राहकांना देण्यात येणार आहे. तसेच महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी दुचाकी कर्जधारकाला वाहन सोपविण्यात येणार आहे. तरी बँकेच्या सभासदांनी, ग्राहकांनी तसेच महोत्सवासाठी आलेल्या रसिक मंडळींनी बँकेच्या स्टॉलला भेट द्यावी. असे आवाहन बँकेचे संचालक धनंजय खातू यांनी केले आहे. Bank Stall at Vyadeshwar Mahotsav

शहरांमध्ये महोत्सवाच्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रातील संस्था आपल्या स्टॉलद्वारे संस्थेचे कार्य जनतेसमोर ठेवत असतात. गुहागरमध्ये कोणताही महोत्सव म्हटले की खाद्य पदार्थांचे स्टॉल हे गणित पक्के झाले आहे. अन्य कोणत्याही संस्था स्वत:चा स्टॉल लावून संस्थेची ध्येय धोरणे, कार्य, उपक्रम, आदी माहिती प्रसारीत करतात. हे धाडस चिपळूण अर्बन बँकचे संचालक श्री. धनंजय खातू यांनी दाखविले. गेली दोन वर्ष श्री व्याडेश्वर महोत्सवामध्ये  चिपळूण अर्बन बँकेचा (Chiplun Urban Bank) स्टॉल लावण्यात येत आहे. त्याचा फायदा ही बॅकेला झाला आहे. Bank Stall at Vyadeshwar Mahotsav

यावर देखील श्री व्याडेश्वर महोत्सवामध्ये शनिवार दि.०९/०३/२०२४ ते सोमवार दि.११/०३/२०२४ या कालावधीत चिपळूण अर्बन  बँकेचा स्टॉल असणार आहे. बँकेच्या कर्ज व ठेवींच्या विविध आकर्षक योजनांची माहिती या परिसरातील ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याचा उपयोग शाखा गुहागर बरोबरच, गुहागर परिसरातील शृंगारतळी, आबलोली, मार्गताम्हाने या शाखांना होणार आहे. बँकेच्या मा. संचालक मंडळातील सदस्यांनी या ठिकाणी आवर्जून भेट दयावी. येथील सेवक वर्गाला प्रोत्साहित करावे. असे आवाहन चिपळूण अर्बन बँकेचे पालक संचालक धनंजय खातू यांनी केले आहे. Bank Stall at Vyadeshwar Mahotsav

या उपक्रमाचे यशस्वीतेसाठी बँकेचे चेअरमन श्री.निहारशेठ गुढेकर, व्हा.चेअरमन श्री.निलेशशेठ भुरण, संचालक श्री.प्रशांतशेठ शिरगावकर, गुहागर शाखेचे पालक संचालक श्री.धनंजयशेठ खातू, बँकेचे सीईओ श्री देसाई यांचे मार्गदर्शनखाली बँकेचा कर्मचारीवर्ग मेहनत घेत आहे. Bank Stall at Vyadeshwar Mahotsav

Share101SendTweet63
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.