जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा
गुहागर, ता. 06 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा वेलदूर नवानगर शाळेच्या फिरती प्रयोगशाळा उपक्रमाअंतर्गत सेवा दिशा भारती या महत्त्वपूर्ण ॲपवर नोंदणी करण्यात आली. त्यावेळी मनोहर पवार म्हणाले की, वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये फिरती प्रयोगशाळा हा उपक्रम अनेक वर्ष यशस्वीपणे सुरू आहे. Veldur School now on ‘Seva Disha’ app

त्यावेळी जनकल्याण समिती गुहागर तालुका फिरती प्रयोगशाळा प्रकल्प प्रमुख मनोहर पवार, विज्ञान शिक्षक श्री खांडेकर, मुख्याध्यापक मनोज पाटील, अंजली मुद्दामवार, सोनाली खडपे, रेवती साखरकर, परीक्षित दाभोळकर, सलोनी पालशेतकर, नैतिक हरंचकर व विद्यार्थी उपस्थित होते. सदर उपक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती पालक व शिक्षकांचे उत्स्फूर्त सहकार्य लाभत आहे. Veldur School now on ‘Seva Disha’ app
