गुहागर, ता. 01 : तालुक्यातील तवसाळ तांबडवाडीत “वाघ बारस” मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ” वाघ बारशी” हा गुराख्यांचा कार्यक्रम असतो. आपल्या गुरांच संरक्षण व्हाव, गुरांना सुख, समाधान मिळाव, रानात कुठलीही अडचण येऊ नये म्हणून हा कार्यक्रम साजरा केला जातो. ‘Wagh Barashi’ program at Tawasal Tambadwadi


तवसाळ तांबडवाडी मधील तुळशी विवाह पार पाडत असताना वाघबारशीची तयारी केली जाते. तुळशीचं लग्न लावले म्हणून दक्षिणा म्हणून पैसे घेतलें जातात. हि आर्थिक मदत जमा करून योग्य वार पकडून वाघबारशी पुर्व तयारी करतात. तसेच घरोघरी जाऊन घरातील काही सामान ( वनभोजनासाठी ) दिली जाते. खास वैशिष्ट्य म्हणजे पहाटे ५/६ वाजता ग्रामस्थ समुद्रात जाळे ओढून ताजे मासे पकडतात. त्यानंतर ठरलेल्या जागेवर जेवण करून देवाला नैवेद्य दाखवला जातो. एका मुलाला वाघ बनवून त्याला गवताची शेपूट लावतात. बाकी सगळे अंगावर, कमरेभोवती झाडाची पाने, डहाळ्या लावून सजून शेवटी नदीत आंघोळ करून सर्वजण आनंद लुटतात. अशा रितीने वाघबारशीला वाघाला पिटाळून लावले जाते. ‘Wagh Barashi’ program at Tawasal Tambadwadi


यावेळी श्री बारकु निवाते, श्री चंद्रकांत निवाते, श्री प्रदीप निवाते, श्री शिवराम घाणेकर,अनंत घाणेकर, श्री वसंत निवाते, श्री प्रकाश पा.कुळये, श्री महादेव वाघे, श्री काशिनाथ कुळये, श्री दिपक घाणेकर,श्री मोहन घाणेकर, लक्ष्मण वाघे, सौ.मा. सरपंच नम्रता ताई निवाते, ग्राम.पं.मा. सदस्या वत्सला पाडदळे, सुनिता वाघे, हर्शदा निवाते, स्वरा कुळये, सुनंदा कुळये, मयुरी घाणेकर, अर्चना वाघे, श्रावणी निवाते, मनस्वी घाणेकर, सुमित्रा कुळये, राजश्री वाघे, सुवर्णा घडशी, अन्वीता घाणेकर, जागृती पाडदळे, चेतना घडशी, लक्ष्मी घाणेकर, सुचिता वाघे, सुनिता कुळये, प्रतिभा वाघे, सुनिता निवाते, लक्ष्मी गिजये,चंदणी निवाते, प्रगती निवाते, प्रविणा निवाते, सुगंधा घाणेकर, लक्ष्मी वाघे, सखुताई कुळये, शामल पाडदळे, सावित्री कुळये, रूक्मिणी घाणेकर, महिला मंडळ, युवा वर्ग आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘Wagh Barashi’ program at Tawasal Tambadwadi

