• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 April 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

दोघांचे मृतदेह मिळाले, शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

by Manoj Bavdhankar
August 28, 2020
in Old News
17 0
0
Aniket & Vaibhav
34
SHARES
96
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

28.8.2020

गुहागर : गौरी गणपती विसर्जनाच्या दिवशी (ता. 27) बोऱ्या समुद्रात बुडालेल्या दोन्ही तरुणांचे मृतदेह आज (ता. 28) बोऱ्या समुद्रकिनारीच आढळून आले. शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. साश्रुनयनांनी ग्रामस्थांनी आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.

गुहागर तालुक्यातील अडूर भाटलेवाडी येथील ग्रामस्थ गौरी गणपती विसर्जनासाठी बोऱ्या समुद्रकिनारी गेली होती. त्यावेळी वैभव वसंत देवाळे (वय 35) आणि अनिकेत हरेश हळ्ये (वय 22) हे दोन तरुण अन्य तिघांसोबत मोठी गणेशमूर्ती घेवून किनाऱ्यावरील जेटीवर गेले होते. गणेशमुर्ती विसर्जन करताना मोठी लाट आली. या लाटेत पाचही युवक तोल जावून समुद्रात पडले. त्यापैकी तिघांनी पोहत समुद्रकिनारा गाठला. मात्र वैभव आणि अनिकेतला पोहता येत नसल्याने ते समुद्रात बुडाले. रात्री उशिरापर्यंत स्थानिक ग्रामस्थांसह मच्छीमारांच्या मदतीने दोघांचा शोध घेण्यात आला. आज (ता. 28) सकाळी  5 वा. अनिकेत हळ्येचा मृतदेह  बोऱ्या समुद्रकिनाऱ्याजवळील खडपात मिळाला. तर वैभव देवाळेचा मृतदेह दुपारी 2 वा. जेटीजवळ मिळाला. दोन्ही मृतदेह पोलीसांनी ताब्यात घेतले. शवविच्छेदनानंतर ते नातेवाईकांकडे सुपूर्त करण्यात आले.

Share14SendTweet9
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.