राजेंद्र आंब्रे यांनी आमदार भास्कर जाधव यांना दिले प्रत्युत्तर
गुहागर, ता. 22 : ज्या विकास कामांच्या जोरावर तुम्ही अन्य पक्षातील लोकांना तुमच्या पक्षात आणलेत. ती विकास कामे तुम्ही घरातील पैशांमधुन केली नव्हती. शासनाच्या तिजोरीतूनच हे पैसे आणलेत. मग आज खासदार तटकरे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मदतीने कुणबी समाजोन्नती संघाला ५ कोटी रुपये दिले. तर तुमच्या पोटात का दुखते. यापूर्वी तुम्हीही असे काम मच्छीमार समाजात केले आहे. असा प्रश्र्न जिल्हा परिषद सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गुहागर विधानसभा क्षेत्राध्यक्ष राजेंद्र आंब्रे यांनी उपस्थित केला आहे. ते गुहागरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. The development work on the strength of which you have brought people from other parties to your side. You did not do that development work with the money from home. The money was brought from the government. Then today MP Tatkare with the help of Deputy Chief Minister Ajit Pawar gave Rs. 5 crore to Kunbi Samajonnati Sangh. So why you are upset. You have done this before in the fishing community. This question has been raised by Rajendra Ambre, Zilla Parishad member and Guhagar Assembly constituency president of NCP. He was talking to reporters in Guhagar. (Why you are upset)


लोटे जिल्हा परिषद गटात 17 नोव्हेंबरला एका रुग्णवाहीका उद्घाटनाच्या कार्यक्रमात आमदार जाधव यांनी कांगणे, राजपुरे यांच्या राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशावरुन नाव न घेता खासदार तटकरेंवर निशाणा साधला होता. आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav) त्यावेळी म्हणाले होते की, ही मंडळी आपल्या समाजाच्या कामाकरीता सरकारच्या तिजोरीतून निधी मिळावा म्हणून विनंती करायला गेले होते. मात्र ज्या राज्याचे प्रमुख शिवसेनेचे (Shiv Sena) आहेत त्यांच्या सहकाऱ्यांनी पैसे दिले त्याचं भांडवल काही जणांनी केले. आणि पक्षप्रवेश करुन घेतले. हे शरद पवार (sharad Pawar), उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आवडले नसते. भावनांचा राजकारणासाठी वापर केला गेला हे चुकीचे आहे.


त्यांच्या या वक्तव्याला प्रत्युत्तर करताना जिल्हा परिषद सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गुहागर विधानसभा क्षेत्राध्यक्ष राजेंद्र आंब्रे म्हणाले की, गुहागर (Guhagar) विधानसभा मतदारसंघाचे आमदार, माजी मंत्री आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav) यांनी शासनाच्याच तिजोरीतूनच पैसे आणलेत. त्या पैशातून केलेल्या विकास कामांच्या जोरावरच त्यांनी अनेकांचा पक्षप्रवेश करुन घेतले. हे पैसे तुम्ही तुमच्या घरातून आणून विकास कामांसाठी खर्च केले नव्हते. 100 वर्ष कुणबी समाजोन्नती संघाला पूर्ण झाली. त्यावेळी कुणबी समाजातील काही मंडळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांना भेटायला गेली. बाबाजी जाधव यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यासोबत भेट घडवून आणली. त्यानंतर ही मंडळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (National President of NCP Sharad Pawar) यांना देखील भेटली. कुणबी समाजोन्नती संघाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त मुंबईत इमारत बांधण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादांनी महाराष्ट्र शासनाच्या अर्थसंकल्पातून 5 कोटी रुपये मंजूर केले. हा निधी शासनाच्या तिजोरीतून आणला हे सर्वांनाच माहिती आहे.

