डॉ. नातू : निरामय सुरु व्हावे ही गुहागरकरांची मागणी
गुहागर, ता. 02 : निरामय रुग्णालय सुरु करावे यासाठी वर्षभरापूर्वी गुहागरवासीयांनी सामाजिक माध्यमांवर चळवळ सुरु केली होती. अशा वेळी स्थानिकांसह येथील लोकप्रतिनिधींना बाजुला ठेवून निरामय रुग्णालयाचा पहाणी दौरा मंत्र्यांनी, जिल्हाधिकाऱ्यांनी सिंधुदूर्गमधील खासदारांसोबत का केला. असा प्रश्र्न भाजपाचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी उपस्थित केला आहे.
डॉ. विनय नातू म्हणाले, मंत्री, जिल्हाधिकारी, सिंधुदूर्गचे खासदार गुहागरमध्ये आले ते बरेच झाले. अपेक्षित होते त्यांनी गेल्यावर्षी बंद केलेल्या मोडकाआगर पुलाचे काम पहातील. भातगाव राई पुलावरुन येताना खाडीत शासनाचे अनधिकृत सुरु असलेले काम पहातील. पण त्यांनी हे दोन्ही विषय टाळून थेट निरामयला भेट दिली. याबाबतीत प्रशासनाला वर्षभराने जाग आली. हे रुग्णालय सुरु होण्यासाठी वर्षभरापूर्वी तालुकावासीयांनी मोहिम उघडली. काही मंडळींनी मंत्र्याची, शासकीय अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यामुळे गुहागरला ते आले हे चांगलेच झाले. पण कोणत्याही मंत्री महोदयांचा दौरा ठरवताना शिष्टाचार ठरलेला आहे. त्याप्रमाणे दौऱ्याची, त्यातील विषयांची माहिती स्थानिक लोकप्रतिनिधींना, त्या विषयाशी संलग्न असलेल्यांना दिली जाते. जेणेकरुन सर्वांशी चर्चा करुन निर्णय घेणे सोपे होते. इथे तर गुहागरचे आमदार, गुहागरचे खासदार यांना कोणतीही माहिती होती का. कारण त्यांची उपस्थिती इथे दिसली नाही. ज्या जिल्हा परिषद गटात निरामय रुग्णालय येते तेथील जिल्हा परिषद सदस्य सध्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत. त्यांना राज्यमंत्र्याचा दर्जा आहे. त्यांचीही उपस्थिती दिसली नाही. मग इथल्या स्थानिकांना, लोकप्रतिनिधींनी टाळून मंत्री महोदय आणि सिंधुदूर्गचे खासदार इथे नेमके कशाकरता आले. दुर्देवाने शिष्टाचार सोडून झालेल्या दौऱ्याला जिल्हाधिकाऱ्यांनी कशाप्रकारे साथ दिली हे देखील सर्वांपर्यंत पोचले आहे.
तसेच केवळ रुग्णालयाची पहाणी करायची होती आणि अधिकाऱ्यांकडून माहिती घ्यायची होती तर दौऱ्याची खरचं आवश्यकता होती का. निरामयची अंतर्गत परिस्थिती काय आहे याची माहिती येथील स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली असती. अधिक माहितीसाठी व्हिडिओ पाठवले असते. मालकी संदर्भातील जी माहिती येथे मिळाली तीच माहिती रत्नागिरीत थांबूनही घेता आली असती. तेवढ्यासाठी एक खासदार आणि एक मंत्री यांना यावे लागत असेल तर तर उध्दवा अजब तुझे सरकार का म्हणू नये. मग अधिकाऱ्यांचे काम काय हा सुध्दा प्रश्र्न उपस्थित होतो.
Guhagar residents had started a movement on social media a year ago to start a Niramay hospital. Then Why did the Minister, the District Collector, and MP’s from Sindhudurga aside the Guhagar MLA, The President of Ratnagiri Zilha Parishad, a representative from Anjanwel ZP, and the activist of Guhagar? Asked BJP’s Uttar Ratnagiri district president and former MLA Dr. Vinay Natu.
