• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
25 August 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

डायबेटीस म्हणजे काय?

by Guhagar News
December 10, 2021
in Health
21 0
16
Diabetes
41
SHARES
116
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

आजपासून महिनाभर डायबेटीस संदर्भात जनजागृती करण्यासाठी सदर लेखमाला सुरू केली आहे. ही लेखमाला डॉ. सुशीलकुमार मुळ्ये, डॉ. मीरा मुळ्ये, अपेक्स हॉस्पिटल रत्नागिरी, (संपर्क क्रमांक : ९६५७२५७५२७) यांच्या सहकार्यातून प्रसिध्द केली जात आहे.  अधिक माहितीसाठी सोबतच्या क्रमांकावर फोन करावा.

डायबेटीस म्हणजेच मधुमेह आता सगळ्यांनाच माहित असलेला आजार आहे. दर दहा माणसांमागे चार माणसांना तरी डायबेटीसची समस्या असतेच. खूप कमी कुटुंब आहेत जिथे हा आजार दिसत नाही.
आपल्या भारत देशात मधुमेहींची संख्या खूप जास्त आहे. त्यात डायबेटीस टाइप १ आणि डायबेटीस टाइप २ या श्रेणीतील रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. जगातील मधुमेहाची राजधानी म्हणून भारत ओळखला जातो ही एक खेदाची गोष्ट आहे.
Diabetes is now a well-known disease. At least four out of every ten people have diabetes. There are very few families where the disease is not seen. The number of patients with type 1 diabetes and type 2 diabetes is increasing rapidly in our country. It is a pity that India is known as the diabetes capital of the world.
पूर्वी मधुमेह म्हटला की लोक घाबरून जायचे, आताही घाबरतातच पण त्यामानाने आता बऱ्यापैकी जागरूकता निर्माण झाली आहे.
तरी काही गोष्टी अशा आहेत ज्या आजही सामान्य लोकांना माहित नाहीत. याच गोष्टी आम्ही आज तुमच्यापुढे उलगडणार आहोत. आता आपण जाणून घेऊया काय आहे हा मधुमेह ? काय आहेत याची लक्षणे ? यावर उपचार आहेत तर काय आहेत? आधुनिक वैद्यक पद्धतीत रक्तात वाढलेली साखर व इन्शुलीन एवढीच संकल्पना न राहता नवीन औषधे, उपचार पद्धती नवे तंत्र, नव्या तपासण्या, याची ओळख करून देणे. हा या लेख मालिकेचा उद्देश आहे.
•डायबेटीस संदर्भात प्रश्नांची उत्तरे देणे.
•मोफत/ कमी खर्चात औषधे, तपासण्या उपलबद्ध करून देणे.
•डायबेटीस पेशंटची दिनचर्या/ आहार यांचे मार्गदर्शन.
अपेक्स हॉस्पिटल मध्ये डायबेटीस पेशंटसाठी वेगवेगळ्या अनेक तज्ञांचा ग्रुप काम करीत आहे.त्याचे मोफत मार्गदर्शन समाजाला देणे ही सामाजिक जबाबदारी व बांधिलकी आम्ही स्विकारली आहे.
आपण प्रथम पाहू,

डायबेटीस म्हणजे काय?

आधुनिक शास्त्राप्रमाणे विशिष्ट व्याख्या- शरीरातील साखरेचे प्रमाण वाढल्याने(कोणत्याही कारणाने) चयापचय विकृती होऊन कार्बोहायड्रेट, चरबी (fats), प्रथिने (प्रोटीन्स) यांचा पचनात बिघाड होतो व त्यांचा परीणाम रक्तवाहिनी, चेतासंस्था (nervous system), अर्थात सर्व प्रकारच्या पेशींवर परिणाम होतो. (स्थायू, अस्थी, लिवर,अशा अनेक) यामुळे अनेक अवयवांची कार्यहानी होते असा आजार.
सामान्य व्याख्या – डायबेटीस म्हणजे चयअपचयाचा दोष होय म्हणजेच अन्नाचे परिवर्तन हे साखरेत होते, ज्याचे परिवर्तन हे उर्जेत होते. स्वादुपिंडातील इन्सुलिन नावाचे हार्मोन शरीरातील पेशीत जाऊन त्याचे परिवर्तन करण्यास मदत करते, या क्रियेत अडथळा अथवा हि क्रिया न होणे म्हणजेच डायबेटीस (diabetes).
पुन्हा याची दोन कारणे-
१.इन्सुलिन (Insulin) तयार न होणे
२.शरीर इन्सुलिनचा वापर करू न शकणे.

(क्रमशः)

रत्नागिरीमधील अपेक्स हॉस्पीटलमध्ये मधुमेहींसाठी 22 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर या कालावधीत मोफत शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज केवळ 50 रुग्ण तपासण्यात येणार आहेत. नोंदणीसाठी *8482948439* या मोबाईल क्रमांकावर फोन करावा.

Share16SendTweet10
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.