गुहागर, ता. 01 : सागरी सीमा मंच आणि शिवशंभु विचार मंचची सागर परिक्रमा यात्रेने 29 डिसेंबरला सायंकाळी 6.30 वाजता बुरोंडीच्या बंदरात दाखल झाली. बुरोंडीतील समुद्रकिनाऱ्यावर तेथील शक्तीकेंद्राच्या कार्यकर्त्यांनी स्वागताची जय्यत तयारी केली होती. परिक्रमेतील 23 शिलेदारांचे स्वागत करण्यासाठी बुरोंडीच्या समुद्रकिनाऱ्यावर छोटे व्यासपीठ, छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, आसन व्यवस्था असा जामानिमा करण्यात आला होता. येथील चार कार्यकर्ते छोटी नौका घेवून परिक्रमावासीयांना बंदरात आणण्यासाठी समुद्रात गेले होते. Welcome to Burundi ‘Sagri Parikrama’
परिक्रमेचे आकर्षण असलेली शिडाची नौका बुरोंडीच्या समुद्रकिनाऱ्यावर आल्यावर या नौकेचे स्वागत ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. परिक्रमावासीयांचे बुरोंडीतील सुवासीनींनी औक्षण केले. मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीचे पूजन व दिप प्रज्वलन केले. त्यानंतर बुरोंडी शक्तीकेंद्रातील कार्यकर्त्यांनी परिक्रमावासीयांचे स्वागत केले. स्वागत समारंभानंतर बुरोंडीतील शालेय मुलींनी महाराष्ट्र गीत व पोवाडा सादर केला. त्यानंतर सागरी परिक्रमेच्या आयोजनाबाबतची माहिती शिवशंभु विचार मंचचे सुनील चव्हाण यांनी दिली. पूर्वी पावशे या चिमुकलीने शिवाजी महाराजांची माहिती सांगितली. अनिकेत कोंडाजी यांनी सुरक्षित किनारपट्टी, स्वच्छता व पर्यावरण याबाबत उद्बोधन केले. दिड तास चाललेल्या या कार्यक्रमाची सांगता संपूर्ण वंदेमातरमने झाली. Welcome to Burundi ‘Sagri Parikrama’