मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार यांचा पुढाकार
गुहागर, ता. 24 : जल जीवन मिशन या अभियानातंर्गत सर्व ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना विहीत गुणवत्तेसह, पुरेसे (५५ लिटर प्रति मानसी, प्रतिदिनी) व नियमित स्वरुपात पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे. मार्च २०२४ अखेर पर्यंत संपुर्ण जिल्हा हे “हर घर नल से जल” म्हणून घोषित करण्याचे राज्याने उद्दिष्ट ठेवले असल्या दिनांक २६ जानेवारी, २०२३ रोजीच्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आयोजित ग्रामसभेमध्ये जल जीवन मिशनच्या अनुषंगाने कामांच्या बाबतीत वाचन व चर्चा विनीमय करण्यात येणार आहे. ‘Water Life Mission’ in Gram Sabha
सदरच्या अभियानाला लोकसहभाग व पारदर्शकता मिळवून देण्यासाठी विविध स्तरावर व्यापक प्रचार, प्रसिध्दी देणे आवश्यक असल्याने जल जीवन मिशन संदर्भात ग्रामसभे दरम्यान ग्रामपंचायत सदस्यांसोबत ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीच्या सदस्यांना आमंत्रित करुन विशेष स्थान देण्यात यावे व समिती सदस्यांची ओळख तसेच त्यांच्या अधिकार व जबाबदारीबाबत उपस्थित ग्रामस्थांना माहिती दिली जाणार आहे. पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षणांतर्गत पाणी गुणवत्ता चाचणीसाठी प्रशिक्षीत करण्यात आलेल्या ५ महिलांना सभेस आमंत्रित करुन सन्मानित करण्यात येणार असून सदर महिलांची संपर्क क्रमांकासहीत नावे गावातील सार्वजनिक ठिकाणी ठळकपणे प्रसिध्द करण्यात येणार आहे, जेणेकरुन त्यांचा उत्साह वाढीस लागून पाणी गुणवत्ता राखण्याच्या अनुषंगाने गाव स्वयंनिर्भर होईल. ग्रामसभे दरम्यान क्षेत्रिय तपासणी संच (FTK) च्या माध्यमातून महिलांद्वारे स्त्रोतांची तपासणी व नळ जोडणीव्दारे येणाऱ्या पाण्याच्या नियमित तपासणीबाबतच्या कार्यपध्दतीची माहिती ग्रामसभेमध्ये माहिती देण्यात येणार आहे. ‘Water Life Mission’ in Gram Sabha

ग्रामसभे दरम्यान जल जीवन मिशन अंतर्गत मंजूर योजनेची सविस्तर माहिती जसे योजनेचे उद्दिष्ट, योजनेतील समाविष्ट उपांगे, मंजुर निविदेची रक्कम, योजनेचा कालावधी, कंत्राटदारांचे नाव, नळ जोडणीची सद्यस्थिती इ. तसेच प्रगतीत असलेल्या व पूर्ण झालेल्या कामांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच योजनेअंतर्गत गावातील पाणी पुरवठा सुविधांच्या अनुषंगाने आवश्यक जमा करावयाचा समुदायाचा वाटा (लोकवर्गणी ५% किंवा १०%), जमा झालेली रक्कम व उर्वरित जमा करावयाची रक्कम याबाबत आवश्यक कृती योजना आखण्याबाबत चर्चा घडवून आणण्यात येणार आहे. नळ पाणी पुरवठा योजना पुर्णत्वानंतर योजना शाश्वततेच्या दृष्टीने आवश्यक पाणीपट्टी वसुली तसेच योजनेची थकीत पाणीपट्टी वसुली संदर्भात विशेष चर्चा करण्यात यावी. दिनांक २६ जानेवारी पूर्वी जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेची माहिती दर्शविणारे समूह माहिती फलक (Community Information Board) योजनेच्या ठिकाणी यापूर्वी प्रदर्शित केला नसल्यास, तो प्रदर्शित करणे व ग्रामसभेमध्ये अवगत करणेत येणार आहे. ‘Water Life Mission’ in Gram Sabha
दिनांक २६ जानेवारी, २०२३ रोजीच्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आयोजित ग्रामसभेमध्ये जल जीवन मिशनच्या अनुषंगाने ग्रामसभेमध्ये कामांच्या बाबतीत वाचन व चर्चा विनीमय करणेबात मुख्य कार्यकारी अधिकारी, यांनी तालुका स्तरीय यंत्रणेस सुचित करुन होणाऱ्या ग्रामसेभेमध्ये सर्वांनी सहभागी होणेचे आवाहन केले. ‘Water Life Mission’ in Gram Sabha
