गुहागर : गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे शुक्रवार दि. 3 डिसेंबर रोजी सकाळी 11.00 वाजता संस्थेच्या वरवेली चीरेखाण फाटा येथील कार्यालयात जागतिक दिव्यांग सहाय्यता दिन समारंभपूर्वक साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
On behalf of Guhagar Taluka Handicapped Rehabilitation Society Friday as every year. On December 3rd World Disability Aid Day will be celebrated at 11.00 am at the office of the organization at Varveli Chirekhan Fata. Various programs have been organized on this occasion.


या कार्यक्रमाचे औचित्य साधून संस्थेच्या 19 व्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. दिव्यांगासाठी असणाऱ्या विविध योजना व सवलतींची माहिती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या दिव्यांगांसाठी मोफत रक्तगट व शुगर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. संस्थेच्या वतीने दिव्यांगत्वावर मात करून स्वतःचा व्यवसाय उद्योग करून यशस्वी झालेल्या दिव्यांगांना ‘स्वयंसिद्ध’ हा पुरस्कार व दिव्यांगांसाठी विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीस दिव्यांग मित्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी चांगले आयुष्य लाभण्यासाठी आरोग्यविषयक अनेक प्रकारच्या तक्रारी व त्यावरील उपाय योजना या बाबतीतील मोलाचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे
गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्था सर्व प्रकारच्या दिव्यांगांसाठी नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवित असते. या दिव्यांग दिनाचे औचित्य साधून घेतलेल्या या कार्यक्रमास तालुक्यातील व जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या दिव्यांगानी उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्री उदय रावणंग व सरचिटणीस श्री सुनील रांजणे यांनी केले आहे.

