91 ग्रामस्थांनी घेतली कोविशिल्डची पहिली मात्रा
गुहागर, ता. 26 : तालुक्यातील सडे जांभारी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात आज लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला ग्रामस्थांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. 80 वर्षी सावित्री जानू बारस्कर या आजींनीही कोविशिल्डची पहिली लस घेतली. त्यांचे उपस्थित सर्वांनीच कौतुक केले.
सडेजाभांरी हे कोळवली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील उपकेंद्र आहे. निर्बंध असल्याने सार्वजनिक वहातूक बंद आहे. अशावेळी ग्रामस्थांना लसीकरणासाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. त्यामध्ये आर्थिक आणि वेळेचे नुकसान होते. तसेच परतीच्या प्रवासाला वाहन उपलब्ध होईल की नाही हे ही सांगता येत नाही. त्यामुळे सडेजाभांरीती सरपंच अंकुश माटल यांनी कोळवली प्राथमिक आरोग्य केंद्राकडे सडेजांभारी उपकेंद्रात लसीकरणची व्यवस्था करावी अशी विनंती केली होती. त्याप्रमाणे आज सडेजांभारी उपकेंद्रात लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते.
कोविशिल्ड लसीची पहिली मात्र देण्यासाठी कोळवली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. जांगिड, आरोग्य सेवक दुपटे, आरोग्य सहाय्यक चाळके, आरोग्य सेविका जावळे आणि नाटेकर, आशा सेविका वृंदा देवरुखकर व स्वाती सुर्वे, आरोग्य मदतनीस पवार सडेजांभारी उपकेंद्रात आले होते. सरपंच अंकुश माटल, उपसरपंच वनिता डिंगणकर, तंटामुक्ती अध्यक्ष अनिल सुर्वे, पोलिस पाटील प्रभाकर सुर्वे, सर्व ग्रामपंचायत सदस्य सदस्य, ग्राम कृती दलाचे सदस्य, व ग्रामपंचायत कर्मचारी राजेश सोलकर यांनी लसीकरण कार्यक्रमाचे नियोजन केले. सडेजांभारीतील 91 ग्रामस्थांना लसीची पहिली मात्र देण्यात आली. सावित्री जानू बारस्कर या 80 वर्षांच्या आजीही लसीकरणासाठी आल्या होत्या. कोराना रोगापासून वाचायचे असेल तर सर्वांनी लस घेतली पाहिजे. असे आवाहन त्यांनी केले. आजींचे उत्स्फुर्तपणे केलेल्या या जनजागृतीचे सर्वांनीच कौतुक केले.
(91 People vaccinated in Sade Jambhari (tal. Guhagar). Kolavali Primary Helath Centre’s Staff arrenged this vaccination camp at Sade Jambhari Primary Health Subcentre. In this camp 91 villegers take 1st dose of Covishield Vaccine including 80 Years old woman. After vaccination the women Savitri Janu Barskar Said, Vaccince is safe and must to take vaccince for security from Corona pendamic.)
.




