भारतातील शक्तिशाली व्यक्तींकडून टाकला जातोय दबाव
गुहागर, ता. 1 : सीरम इन्स्टिट्युटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांना कोविशिल्ड लसीच्या पुरवठ्याबाबत धमक्यांचे फोन येत आहेत. यामध्ये भारतातील मुख्यमंत्री, उद्योजक यांचाही सहभाग आहे. त्यांच्या अपेक्षा आणि त्यासाठीची आक्रमकता अनाकलनीय आहे. अशी प्रतिक्रिया अदर पुनावाला यांनी द टाईम्स या लंडनमधील वृत्तपत्राच्या मुलाखतीत व्यक्त केली आहे. दरम्यान भारत सरकारने अदर पुनावाला यांना वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था देऊ केली आहे. Serum Institute CEO Adar Poonawalla Said for Demanding Vaccine, threatening Phone calls from Powerful like CM, Businessman. Their expectations and aggression for it are incomprehensible. The Times from London takes Interview of Adar Poonawalla. Earlier Indian government provided ‘Y’ category security to Adar Poonwalla


भारतात सध्या कोविशिल्ड (Covishield) आणि कोव्हॅक्सिन या दोन लसी नागरिकांना देण्यात येत आहेत. दुसऱ्या लाटेत कोरोनाग्रस्तांची संख्या वाढु लागल्यानंतर केंद्र सरकारने लसीकरणाचा वेग वाढवला आहे. मात्र देशातील लोकसंख्या आणि उपलब्ध लस यांचे प्रमाण व्यस्त आहे. लस मिळण्यासाठी भारत सरकारच्या कोविन ॲपवर नोंदणी करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लस मिळावी म्हणून लसीकरण केंद्रासमोर नागरिक गर्दी करत आहेत. या पार्श्र्वभुमीवर अदर पुनावाला यांनी शक्तीशाली व्यक्तींकडून धमक्या मिळत असल्याचे विधान केले. त्यामुळे देशात खळबळ उडाली आहे.


काय म्हणाले अदर पुनावाला
शनिवारी (ता. 1 मे) लंडनमधील वृत्तपत्र द टाईम्स द्वारे अदर पुनावाला यांची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी बोलताना पुनावाला म्हणाले की, भारताला आवश्यक असणाऱ्या लशीपैकी 90 टक्के लस निर्माण करण्याचे काम सध्या सीरम इन्स्टिट्युटमध्ये सुरु आहे. आज प्रत्येकाला असे वाटतयं की दुसऱ्या आधी आपल्याला लस मिळाली पाहिजे. या अपेक्षांपोटी भारतातील शक्तिमान लोकांकडून माझ्यावर दबाव टाकला जातोय. मला धमक्या दिल्या जात आहे. ही आक्रमकता माझ्यासाठी अनाकलनीय आहे. त्यांच्या मागण्या मी पूर्ण करु शकत नाही. कदाचित त्यांच्या अपेक्षा रास्त असतीलही, परंतू त्या पूर्ण करण्यासाठी अशापध्दतीने वागणे हे नक्कीच योग्य नाही. मला कोणतीही सुरक्षा व्यवस्था दिली गेली तरी ते काय करतील याचा अंदाज येवू शकत नाही. त्यामुळेच मी, माझ्या पत्नी आणि मुलांसह लंडनमध्ये आलो आहे.