• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
13 July 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

ते दोघे पर्यटनासाठी चक्क धावले

by Mayuresh Patnakar
January 17, 2022
in Travel
17 1
0
They ran for Tourism

Dr. Ajit Oak and Satish Gujaran : Ran for Tourism

34
SHARES
98
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

They ran for tourism

गुहागर, ता. 16 : कोकणातील निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक (Tourist) कार, बाईक अगदी सायकल घेवूनही येतात. पण कोकणातील हिरवागार निसर्ग पहाण्यासाठी कडाक्याच्या थंडीत कोणी धावला तर काय म्हणाल.  होय हे खरे आहे. कोकणच्या निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी दोन पर्यटक गुहागरपासून चक्क धावत गणपतीपुळ्यापर्यंत पोचले. (They ran for Tourism) डॉ. अजित ओक आणि सतीश गुजरन अशी त्यांची नावे आहेत.

डोंबिवलीचे डॉ. अजित ओक (सुप्रसिध्द बालरोगतज्ञ) आणि मुलुंडमध्ये रहाणारे सतीश गुजरन हे राष्ट्रीय धावपटू (National Runner)आहेत. देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील मॅरेथॉन स्पर्धांमध्ये त्यांनी अनेकवेळा सहभाग नोंदवला आहे. याशिवाय पोलीस दल, नौदल यासह विविध कंपन्यांमधील उच्चस्तरीय अधिकारी, उद्योजक यांना धावण्याचे प्रशिक्षणही ते देतात.

They run for Tourism
They ran for Tourism

हे दोघे गुहागरमध्ये पर्यटनासाठी आले होते. त्यांनी गुहागरमधील पर्यटन व्यावसायिक केदार खरे यांच्याजवळ गुहागर ते गणपतीपुळे धावत जाण्याची कल्पना मांडली. They ran for Tourism रुट मार्शल म्हणून काम करण्याची तयारी केदार खरे यांनी दाखवली. आणि 13 जानेवारीला भल्या पहाटे 5 वाजता कडाक्याच्या थंडीतून श्री व्याडेश्र्वराचे दर्शन घेवून ओक आणि गुजरन यांनी धावण्यास सुरवात केली. या प्रवासात भातगांव राई पुलावर  पायांना विश्रांती मिळावी म्हणून काहीकाळ थांबून त्यांनी थोडा व्यायाम केला. आणि पुन्हा धावण्यास सुरवात केली. 11 तास 12 मिनिटे आणि 58 सेकंद  या वेळात त्यांनी 80.80 कि.मी.चे अंतर पार करुन गणपतीपुळे गाठले. They ran for Tourism

They ran for Tourism
They ran for Tourism : Dr. Oak, Satish Gujaran with Kedar Khare

या उपक्रमाविषयी बोलताना डॉ. अजित ओक म्हणाले की, माझे मुळ गांव गुहागरमधील वेळंब हे आहे. कोकणातील निसर्ग सौंदर्य न्याहाळत पर्यटन करायचे असेल तर चालत, धावत किंवा सायकलने करावे. They ran for Tourism अशा प्रवासात आपल्याला अनेक पक्षी भेटतात. निसर्गाची विविध रुपे जवळून अनुभवता येतात. त्यांचा आनंद लुटता येतो. हल्ली अनेक सायकलस्वार कोकणात येतात. त्याचप्रमाणे धावपटू, अन्य ॲथलीट हे देखील कोकणात यावेत यासाठी आम्ही हा उपक्रम केला. पहाटेचे धुक्यात दवबिंदू अंगावर घेत धावलो. कोवळी उन्हे, दुपारचे कडाक्याचे उनं आणि वाऱ्याची शितलता अनुभवली. They ran for Tourism यामध्ये आमची व्यवस्था केदार खरे यांनी उत्तम रितीने सांभाळली. यानिमित्ताने अशी व्यवस्था स्थानिक पर्यटन व्यावसायिक देवू शकतात हा विश्र्वास आम्ही अनेकांना देवू. असे उपक्रम करण्याचा आग्रह धरु. त्यातून येथील पर्यटन अधिक समृध्द होईल.

They ran for Tourism
They ran for Tourism
Tags: National runnerThey ran for Tourism
Share14SendTweet9
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.