रत्नागिरीतील औद्योगिक विकास व मूलभूत सुविधांसाठी 88 कोटीची योजना
रत्नागिरी दि. 05 : रत्नागिरी औद्योगिक क्षेत्र (मिरजोळे ब्लॉक) अनिवासी इमारत अंतर्गत नवीन अतिथीगृहाचे बांधकाम करणे आणि जुन्या अतिथीगृह इमारतीचे नुतनीकरण करणे या कामांचे भुमिपुजन राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. The guest house will be built in Ratnagiri Industrial Estate
यावेळी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, एमआयडीसीचे मुख्य अभियंता सुभाष तुपे, कार्यकारी अभियंता राक्षे, ज्येष्ठ उद्योजक दिलीप भाटकर, फेडरेशन ऑफ रत्नागिरी डी स्टीक चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष प्रशांत पटवर्धन, उपअभियंता बी.एन.पाटील, माजी नगराध्यक्ष राहुल पंडीत, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबू म्हाप आदि मान्यवर उपस्थित होते. The guest house will be built in Ratnagiri Industrial Estate
यावेळी पालकमंत्री म्हणाले की, रत्नागिरी मध्ये येणारे मोठ्या उद्योजकांना तसेच येथील उद्योजकांना बैठक घेण्यासाठी सेव्हन स्टार सारखे विश्रामगृह पाहिजे आणि यासाठी रत्नागिरीमध्ये महाराष्ट्रातील सुंदर, सर्व सोयीनी सुसज्ज असे एमआयडीसीचे विश्रामगृह रत्नागिरी होत आहे. तसेच जुने विश्रामगृहाला देखील बरेच वर्षे झाली असल्याने त्याचेही नुतनीकरण करण्यात येत आहे . यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. लोटे एमआयडीसी साठी 7 कोटी, वॉटर सोर्स टाकी साठी 12 कोटी रुपये निधी मंजूर केल्याचे त्यांनी सांगितले. उद्योजकांना, एमआयडीसी मध्ये काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांना कोणतीही सुविधा अपुरी पडू नये, ही भूमिका समोर ठेवून कामे करण्यात येत आहेत. येथील एमआयडीसीमधील 88 कर्मचाऱ्यांच्या कायम करण्याचा प्रलंबित असलेल्या प्रश्न मार्गी लागला असून त्यांना कायम केल्याचे आदेश येत्या दोन दिवसात येतील. असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. The guest house will be built in Ratnagiri Industrial Estate

रत्नागिरी जिल्हयाच्या उद्योगजगताला ताकद देण्यासाठी 88 कोटी निधी मंजूर केले. यामध्ये एमआयडीसीला जोडणारे शिरगाव, नाचणे, निवसर, निवळी, मिरजोळे, टिके या ग्रामपंचायतील रस्त्यांसाठी 31 कोटी रुपये मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला. इतर काही एमआयडीसीसाठी आवश्यक रस्त्यांसाठी देखील 13 कोटी रुपये मंजूर केले असल्याची माहिती त्यांनी यावेही दिली. The guest house will be built in Ratnagiri Industrial Estate
दावस येथे रत्नागिरी साठी एक एमएयु झाला असून इव्ही व्हेहीकलचा अमेरिकन बेस कारखाना रत्नागिरी येथे होत आहे. लोटे एमआयडीसीमध्ये नवीन उद्योग येत आहेत. शैक्षणिक क्षेत्राचा विचार करता अभियांत्रिकी महाविद्यालयाची इमारत होत आहे. वैद्यकीय महाविद्यालयही रत्नागिरी मध्ये होत आहे. यामुळे रत्नागिरीतील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बाहेर जाण्याची गरज भासणार नाही. रायगड येथे स्कील इंडस्ट्रीज होत आहे त्याचे रत्नागिरी येथे उपकेंद्राला ही तत्वाता मान्यता देण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. The guest house will be built in Ratnagiri Industrial Estate
रत्नागिरी इंडस्ट्रीज डी प्लस पेक्षा चांगल्या सोई सुविधा देण्यात येतील. उद्योजकांसाठी जे जे लागेल ते ते देण्याची हमी शासनातर्फे आम्ही देतो. परंतु उद्योजकांनी देखील रत्नागिरीमध्ये उद्योग करीत असताना येथील स्थानिकांना रोजगारामध्ये प्राधान्य देणे आवश्यक आहे. The guest house will be built in Ratnagiri Industrial Estate
उद्योगवाढीसाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी करण्यात येत आहेत. रत्नागिरी विमानतळाची धावपट्टी उत्कृष्ट धावपट्टी आहे. वर्षभरात विमानतळ सुरु होईल. येत्या महिन्याभरात रत्नागिरीच्या विमानतळावर नाईट लँडींग सुरु होत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. The guest house will be built in Ratnagiri Industrial Estate
कार्यक्रमाच्या सुरुवातील 4 थ्या अशियाई खो खो स्पर्धेमध्ये भारताला विजेतेपद मिळाले यामध्ये मोलाचा वाटा असणाऱ्या रत्नागिरीच्या अपेक्षा सुतार हीचा विशेष सत्कार यावेळी मंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आला. तसेच राष्ट्रीय खो खो संघाचे प्रशिक्षक पंकज चंवडे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य अभियंता सुभाष तुपे यांनी केले. The guest house will be built in Ratnagiri Industrial Estate