कित्ते भंडारीच्या नव्या कमिटीत गुहागरचे 14 उमेदवार
गुहागर, ता. 11 : सुर्वे शेटे पॅनेलमधील सर्वच्या सर्व उमेदवारांना निवडून आणल्याबद्दल नवनिर्वाचित अध्यक्ष भरत शेटे यांनी सर्व मतदारांचे (Thank you Voters) आभार मानले आहेत. कडक उन्हाळा असतानाही मुंबईकरांबरोबर कोकणातील मतदारही केवळ मतदानासाठी मुंबईला आले ही कौतुकास्पद गोष्ट असल्याचे भरत शेटे यांनी गुहागर न्यूजला (Guhagar News) सांगितले.
भंडारी समाजाच्या ऐक्यासाठी स्थापन केलेल्या कित्ते भंडारी ( Kitte Bhandari ) ऐक्यवर्धक मंडळी, दादर मुंबई (Mumbai) या संस्थेची संचालक व विश्र्वस्त पदाची निवडणूक (Elections) रविवारी 5 जूनला दादर मुंबई येथे झाली. 131 वर्ष जुन्या असलेल्या या संस्थेची 16 वर्षात निवडणूक झाली नव्हती. त्यामुळे या निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. बोले पॅनेल विरुध्द उभ्या राहीलेल्या सुर्वे शेटे पॅनेलच्या बांधणीमध्ये गुहागर भंडारी समाजाचे अध्यक्ष भरत शेटे यांची महत्त्वाची भुमिका राहीली होती. या चुरशीच्या निवडणुकीमध्ये मुळ गाव गुहागर तालुक्यात असणारे 14 जण उमेदवार होते. हे सर्व उमेदवार निवडून आले. (Thank you Voters)
विश्र्वस्त पदाच्या 5 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत तवसाळ करदेचे मधुकर रामचंद्र तोडणकर व आरेगावचे दिपक यशवंत तवसाळकर निवडून आले. कित्ते भंडारी संस्थेचे यापूर्वी तीन वेळा अध्यक्ष राहीलेले गुहागरचे भरत वासुदेव शेटे हे चौथ्यांदा निवडून आले. तसेच संचालक म्हणून निवडून आलेल्या 11 जणांमध्ये पंकज प्रभाकर मोरे (गुहागर वरचापाट), अरविंद सुर्वे व विलास सुर्वे (तवसाळ), सुनिल मोरे व राजेंद्र पाटील (गुहागर खालचापाट), करदे तवसाळचे विनायक शिरधनकर, गुहागर बाग येथील मुरलीधर मदन मोरे, अनिल बागकर, प्रकाश बागकर, विकास बागकर आणि वेळणेश्र्वरचे संजय गुढेकर यांचा समावेश आहे. (Thank you Voters)
निवडणुकीनंतर गुहागर न्यूजशी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष भरत शेटे म्हणाले की, निवडणुकीमध्ये आमच्या पॅनेलचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून यावेत यासाठी आम्ही मेहनत घेत होतो. मुंबईबरोबरच रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि गोव्यात संस्थेच्या सभासदांची संख्या मोठी आहे. कडक उन्हाळा, पावसाळा तोंडावर आल्याने कोकणात सुरु झालेली कामांची लगबग असतानाही कोकणातून विशेषत: रत्नागिरी जिल्ह्यातून आमचे अनेक सभासद मुंबईला आले. त्यातही मनोहर मोरे आणि मोहन बागकर हे वयवर्ष 80 असलेले वयोवृध्द सभासदही त्रास सहन करुन मुंबईला आले. आमच्याही ही कौतुकाची, अभिमानाची गोष्ट आहे. त्यांच्या प्रेमामुळेच सुर्वे शेटे पॅनेलला निवडणुकीत निर्विवाद यश मिळाले आहे. त्याबद्दल या सर्व मतदारांचा मी मनापासून आभारी आहे. (Thank you Voters)
कित्ते भंडारी संस्थेच्या घटनेप्रमाणे यानंतर सर्व संचालकांची सभा बोलावली जाईल. या सभेमध्ये सेक्रेटरी, सहसेक्रेटरी, खजिनदार, सह खजिनदार आणि कार्याध्यक्ष यांची निवड केली जाईल. विश्र्वस्त म्हणून निवडून आलेल्या मंडळींचे काम संस्थेच्या मालमत्तेचे रक्षण करणे, संस्थेच्या घटनेप्रमाणे संचालक मंडळाचे कामकाज होत आहे ना याकडे लक्ष देणे हे आहे. तर अध्यक्ष, उपाध्यक्ष, अन्य पदाधिकारी आणि संचालक यांनी कित्ते भंडारी संस्थेच्या ध्येयधोरणांप्रमाणे कार्यक्रम, उपक्रम राबवायचे असतात. पहिल्या सभेमध्ये पदाधिकाऱ्यांची निवड झाल्यावर भविष्यातील वाटचालीबाबत दिशा ठरवली जाईल. असेही भरत शेटे यांनी सांगितले. (Thank you Voters)