Tag: Turtle

Olive Ridley turtle tagging report

संशोधनातून उलगडली कासवांची प्रवासगाथा

GUHAGAR NEWS : कोकणातील समुद्रकिनाऱ्यांवर ऑलीव्ह रिडले (Olive Ridley) कासव संरक्षण आणि संवर्धनाचा विचार गेल्या 20 वर्षात रुजला. त्यानंतर पश्चिम किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले प्रजातीची कासवे येतात कुठून, त्याचा अधिवास कुठे ...

Records in turtle conservation but failure in breeding

केवळ 7200 कासवांची पिल्ले समुद्रात

संवर्धनात विक्रम पण प्रजननात अपयश मयूरेश पाटणकर,गुहागर, ता. 10 : येथील कासव संवर्धन मोहिमेला यावर्षी विक्रमी यश मिळाले. आजवरच्या इतिहासात प्रथमच 200 हून अधिक मादी ऑलिव्ह रिडले कासवांची 23 हजारपेक्षा जास्त अंडी कासवमीत्रांनी संवर्धित केली. मात्र 10 मे पर्यंत सुमारे 7200 कासवांची पिल्लेच समुद्रात सोडण्यातआली. त्यामुळे प्रजनन दरात प्रचंड घट झाल्याचे समोर येत आहे. याची कारणे शोधण्याचे आव्हान वन विभाग, कांदळवन प्रतिष्ठान आणि कासव मित्रांसमोर उभे ठाकले आहे. Records in turtle conservation but failure in breeding गुहागरमधील कासव संवर्धन मोहिमेला यावर्षी सर्वाधिक यश मिळाले. गुहागरच्या साडेसात किलोमिटर लांबीच्या समुद्रकिनाऱ्यावर 219 मादी ऑलिव्ह रिडले कासवांची घरटी सापडली. यामधुन प्रथमच 23 हजार 78 अंडी कासव संवर्धन केंद्रात संरक्षित करण्यात आली. याचे मुख्य कारण म्हणजे कांदळवन प्रतिष्ठान आणि वन विभागाने गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर देखरेखीसाठी वाढवलेले मनुष्यबळ. यावर्षी प्रथमच 6 कासवमित्रांची नेमणूक संवर्धन आणि संरक्षण मोहिमेसाठी करण्यात आली होती. Records in turtle conservation but failure in breeding कासवांची अंडी संरक्षित केल्यानंतर त्यातून कासवांची पिल्ले बाहेर पडण्याचे प्रमाण हे नेहमीच कमी असते. गुहागरमधील कासव संवर्धनाचा विचार केल्यास दरवर्षी हे प्रमाण 42 ते 47 टक्के इतकेच राहीले आहे. मात्र यावर्षी 10 मे अखेर 23 हजार 78 अंड्यापैकी सुमारे 7200 अंड्यांमधुन पिल्लांचा जन्म झाला. हे प्रमाण केवळ 29 टक्के इतकेच आहे. 219 घरट्यांपैकी आता केवळ 14 घरट्यातून पिल्ले बाहेर  पडणे  शिल्लक आहे. ...

Turtle Festival in Guhagar

पर्यटकांनी कासवांची अंडी व पिल्ले हाताळू नयेत

वन विभागाचे आवाहन, गुहागरातील घटनेचे तीव्र पडसाद गुहागर, ता. 22 : कासव संवर्धन उपक्रम संवेदनशील विषय असून पर्यटकांनी कासवांच्या जीवनाचा आनंद लुटावा मात्र कासवांची अंडी, पिल्ले हाताळू नये. हे प्रकार कासव संवर्धन मोहिमेला हानी पोचवणारे आहेत. असे आवाहन वन खात्याच्या अधिकारी राजश्री कीर यांनी केले आहे. Turtle Festival in Guhagar गुहागर, आंजर्ले, वेळास या ठिकाणी सध्या कासव महोत्सव सुरु आहे. या ठिकाणी अनेक पर्यटक येतात. यातील काही अतिउत्साही मंडळी कासवांची अंडी आणि पील्ले हातात घेण्याची मागणी करतात. आग्रह धरतात. गुहागरमध्ये काही पर्यटकांनी कासवांची अंडी व पिल्ले हाताळली. त्याची छायाचित्रे काढली. सामाजिक माध्यमांवर कौतुकाने प्रसारीत केली. मात्र माध्यमांवर ही छायाचित्रे आल्यानंतर या संपूर्ण घटनेचे तीव्र पडसाद उमटले. कासवप्रेमी, कासव अभ्यासक या सर्वांनी याबाबत प्रश्र्नचिन्ह उपस्थित केले. तर कासव संवर्धन मोहिम राबविणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांनीही त्याची गंभीर दखल घेतली. परिणामी एका कासवमित्रावर निलंबनाची कारवाई झाली. Turtle Festival in Guhagar याबाबत बोलताना वनाधिकारी राजश्री कीर म्हणाल्या की, गुहागरमध्ये प्रथमच कासव महोत्सवाचे आयोजन आम्ही केले. आंजर्ला, वेळास येथे पूर्वीपासून कासव महोत्सव असल्याने तेथे स्वयंसेवकांची प्रशिक्षित टीम आहे. आयोजकांना कोणती काळजी घ्यायची याची माहिती आहे. गुहागरमध्ये पहिलाच प्रयत्न यशस्वी करण्यात आम्ही काही प्रमाणात यशस्वी झालो. कासव महोत्सवाच्या कालावधीत दररोज सुमारे 50 ते 100 पर्यटक समुद्रावर कासवाची पिल्ले पाण्यात झेपावताना पहाण्यासाठी उपस्थित होते. मात्र काही पर्यटकांच्या अतिउत्साहामुळे गडबड झाली. येथील कासवमित्र प्रामाणिकपणे काम करत आहेत. त्यांना कारवाईला सामोरे जावे लागले. पर्यटकांच्या वर्तनामुळे कासव महोत्सवाला गालबोट लागले. हा संपूर्ण प्रकार अज्ञातातून, अनवधानाने घडला असला तरी गंभीर आहे. यामध्ये वन्य जीव संरक्षण कायद्यानुसार पर्यटकांवरही कारवाई होऊ शकते. त्यामुळे पर्यटकांनी आपल्या उत्साहाला आवर घालण्याची आवश्यकता आहे. समुद्रावर येणाऱ्या पर्यटकांनी कासवमीत्रांकडून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करुन निसर्गाच्या आविष्काराचा आनंद लुटावा. मात्र कोणत्याही परिस्थितीत कासवांच्या पिल्लांना हात लावू नये. अंडी हाताळू नये. संवर्धनासाठी उभारलेल्या केंद्रात प्रवेश करु नये. Turtle Festival in Guhagar

The journey of turtles with transmitters

कासवांची आता धाव दक्षिणेकडे

दोन महिने कोकणात होतं वास्तव्य,  निवासाबाबत उत्सुकता मयूरेश पाटणकरगुहागर, 07 :  प्रजोत्पादनासाठी कोकणातील समुद्रकिनाऱ्यावर आलेल्या कासवांनी आता दक्षिणेकडे धाव घेतल्याचे संकेत मिळत आहेत.  हा प्रवास आता नेमका कुठे जाऊन थांबतो. ...