संगीत विशारद परीक्षेत सौ. सुविधा ओक यशस्वी
प्रथम श्रेणीत उत्तीर्ण, गायनकलेचा प्रसार करणार गुहागर, ता. 26 : शहरातील चैताली बाजारच्या संचालिका सौ. सुविधा चिन्मय ओक यांनी संगीत विशारद ही पदवी मिळवली आहे. मे 2023 मध्ये अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय (All India Gandharva College) मंडळाने घेतलेल्या परीक्षेत त्यांना प्रथम श्रेणी मिळाली आहे. गुहागरमध्ये गायन कलेचा प्रसार करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. Sangit Visharad_Suvidha Oak लहानपणापासून गायन कलेची आवड असलेल्या सौ. सुविधा ओक (माहेरच्या सुविधा करमकर) साताऱ्यात असताना प्रारंभिक ते उपांत्य विशारद या परीक्षा प्रथम श्रेणीतच उत्तीर्ण झाल्या होत्या. तिथे झालेल्या अनेक गायनस्पर्धांमध्येही त्यांनी बक्षिसे मिळवली. मात्र विवाहानंतर गुहागरमध्ये संगीत शिक्षणाची सोय नसल्याने त्यांचे शिक्षण थांबले होते. या काळातही त्यांचा रियाज सुरु होता. गुहागरमधील कलाविकास या नाट्यसंस्थेच्या संगीत शारदा मधील इंदिरा, संगीत कान्होपात्रा मधील शिलवती, संगीत एकच प्याला मधील सिंधू अशा विविध भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी काम केलेल्या संगीत शारदा या नाट्यकृतीला राज्यस्तरीय स्पर्धेत अनेक बक्षिसे मिळाली. गुहागर वरचापाट येथील कोपरी नारायण देवस्थान आयोजित संगीत नाट्यप्रवेश स्पर्धेतही त्यांनी काम केलेल्या कट्यार काळजात घुसली नाटकातील रागमालेच्या प्रवेशाला बक्षिस मिळाले. Sangit Visharad_Suvidha Oak लग्नानंतर तब्बल 11 वर्षांनी पुन्हा एकदा चिपळूणला महेशकुमार देशपांडे यांच्याकडे संगीत शिक्षणासाठी सौ. सुविधा ओक यांनी प्रवेश घेतला. मात्र कोरोनामुळे त्यामध्येही खंड पडला. तरीही चिकाटी न सोडता कोरोनानंतर त्यांनी पुन्हा एकदा शिक्षण सुरु केले. आणि मे 2023 मध्ये अखिल भारतीय गांधर्व विद्यालय मंडळाची संगीत विशारद ही परीक्षा त्यांनी दिली. या परीक्षेत त्या प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहेत. Sangit Visharad_Suvidha Oak या सांगितिक प्रवासाबद्दल सौ. सुविधा ओक म्हणाल्या की, गुहागरसारख्या तालुक्यात संगीताचे विशेषत: नाट्यसंगीताचे वेड असलेली मंडळी आहेत. प्रत्येक गावात भजन मंडळे आहेत. मात्र येथे गाण्याची, वादनाची आवड असलेल्यांना शास्त्रीय संगीताचे शिक्षण मिळण्याची सोय नाही. ही उणीव असल्याने विवाहापूर्वी उपांत्य विशारद पर्यंत पोचुनही संगीत विशारद ही पदवी मिळविण्यासाठी 14 वर्ष वाट पहावी लागली. आता गायनाची आवड असलेल्यांना शास्त्रीय शिक्षण मिळण्यासाठी मी स्वत: संगीत विद्यालय सुरु करणार आहे. स्वरानंद या संगीत विद्यालयाद्वारे सुरवातीला गायनाचे शिक्षणाची सोय उपलब्ध होईल. भविष्यात हार्मोनियम, तबला आदी शिक्षणाची व्यवस्था उभी करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. Sangit Visharad_Suvidha Oak
