Tag: Records in turtle conservation but failure in breeding

Records in turtle conservation but failure in breeding

केवळ 7200 कासवांची पिल्ले समुद्रात

संवर्धनात विक्रम पण प्रजननात अपयश मयूरेश पाटणकर,गुहागर, ता. 10 : येथील कासव संवर्धन मोहिमेला यावर्षी विक्रमी यश मिळाले. आजवरच्या इतिहासात प्रथमच 200 हून अधिक मादी ऑलिव्ह रिडले कासवांची 23 हजारपेक्षा जास्त अंडी कासवमीत्रांनी संवर्धित केली. मात्र 10 मे पर्यंत सुमारे 7200 कासवांची पिल्लेच समुद्रात सोडण्यातआली. त्यामुळे प्रजनन दरात प्रचंड घट झाल्याचे समोर येत आहे. याची कारणे शोधण्याचे आव्हान वन विभाग, कांदळवन प्रतिष्ठान आणि कासव मित्रांसमोर उभे ठाकले आहे. Records in turtle conservation but failure in breeding गुहागरमधील कासव संवर्धन मोहिमेला यावर्षी सर्वाधिक यश मिळाले. गुहागरच्या साडेसात किलोमिटर लांबीच्या समुद्रकिनाऱ्यावर 219 मादी ऑलिव्ह रिडले कासवांची घरटी सापडली. यामधुन प्रथमच 23 हजार 78 अंडी कासव संवर्धन केंद्रात संरक्षित करण्यात आली. याचे मुख्य कारण म्हणजे कांदळवन प्रतिष्ठान आणि वन विभागाने गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर देखरेखीसाठी वाढवलेले मनुष्यबळ. यावर्षी प्रथमच 6 कासवमित्रांची नेमणूक संवर्धन आणि संरक्षण मोहिमेसाठी करण्यात आली होती. Records in turtle conservation but failure in breeding कासवांची अंडी संरक्षित केल्यानंतर त्यातून कासवांची पिल्ले बाहेर पडण्याचे प्रमाण हे नेहमीच कमी असते. गुहागरमधील कासव संवर्धनाचा विचार केल्यास दरवर्षी हे प्रमाण 42 ते 47 टक्के इतकेच राहीले आहे. मात्र यावर्षी 10 मे अखेर 23 हजार 78 अंड्यापैकी सुमारे 7200 अंड्यांमधुन पिल्लांचा जन्म झाला. हे प्रमाण केवळ 29 टक्के इतकेच आहे. 219 घरट्यांपैकी आता केवळ 14 घरट्यातून पिल्ले बाहेर  पडणे  शिल्लक आहे. ...