कार्तिकोत्सवानिमित्त संगीत नाट्यप्रवेश स्पर्धा
गुहागर वरचापाट येथे 6 ते 10 नोव्हेंबर उत्सव गुहागर, ता. 04 : गुहागर वरचापाट येथील श्री देव कोपरी नारायण मंदिरात 6 नोव्हेंबर पासून कार्तिकोत्सवाला सुरवात होत आहे. या उत्सवामध्ये नर्मदा परिक्रमा या विषयावर प्रवचन आणि जिल्हास्तरीय संगीत नाट्यप्रवेश स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमांचा आनंद लुटावा असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष समीर घाणेकर यांनी केले आहे. Musical Theater Entry Competition गुहागर वरचापाट येथील श्री देव कोपरी नारायण मंदिरात 6 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत कार्तिकोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवामध्ये परंपरने होणारे धार्मिक कार्यक्रमांबरोबरच 6 नोव्हेंबरला रात्री 9.30 वा. ह.भ.प. ...
