पं. गोविंदराव पटवर्धन संगीत नाट्यप्रवेश स्पर्धा
कोपरी नारायण देवस्थानचे आयोजन; नाट्यसंस्थांना सहभागाचे आवाहन गुहागर, ता. 10 : गुहागर वरचापाट येथील श्री देव कोपरी नारायण देवस्थानने या वर्षीच्या कार्तिकोत्सवानिमित्त जिल्हास्तरीय संगीत नाट्यप्रवेश स्पर्धांचे आयोजन करण्याचे ठरविले आहे. तरी जिल्ह्यातील संगीत नाटके सादर करणाऱ्या कलाकारांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे. असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष समीर घाणेकर आणि स्पर्धाप्रमुख मनीष खरे यांनी केले ...
