Tag: Mahatma Gandhi

History of Tiranga

राष्ट्रध्वजाचा इतिहास

संकलन : मयुरेश पाटणकर आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली. म्हणून 15 ऑगस्टला घरोघरी तिरंगा अभियानाच्या माध्यमातून आपण आपला राष्ट्रध्वज फडकविणार आहोत. या निमित्ताने आपल्या देशाच्या राष्ट्रध्वजाचा इतिहास उलगडून दाखविणारा हा लेख History of Tiranga ध्वजाचा इतिहास (History of Tiranga) रामायण महाभारतापासून प्रत्येक राजाचा स्वतंत्र ध्वज असायचा. प्रभु रामचंद्राच्या ध्वजाला अरूणध्वज म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या भगवा ध्वजावर सुर्याचे चित्र होते. तर महाभारतात अर्जुनाच्या रथावर कपिध्वज होता.  अशी गोष्ट आहे की, युद्ध संपल्यानंतर अर्जुनाच्या रथावरील कपिध्वज उतरवला गेला. त्यानंतर त्या रथाचे भस्म झाले. इतिहासकाळात सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांच्या साम्राज्यात कीर्तिध्वजाचा वापर होत असते. त्यानंतर सम्राट अशोकाने भगवा ध्वज हा साम्राज्य ध्वज म्हणून वापरला. छत्रपती शिवाजी महाराजांनीही भगवा ध्वजच आपले निशाण म्हणून वापरला. काही ठिकाणी त्याचा उल्लेख जरी पटका म्हणून किंवा शिवध्वज म्हणून आहे. इथे मुद्दाम उल्लेख करावसा वाटतो तो म्हणजे वरील सर्व ध्वजांचा रंग भगवा होता. त्यावर वेगवेगळ्या राजांनी आपली चिन्हे रेखाटली होती. History of Tiranga इंग्रजांच्या आक्रमणाच्या काळात 1857 ला उठाव झाला. या वेळी शिवध्वजाची जागा साक्षी ध्वजाने घेतली.  या ध्वज हिरव्या रंगाचा होता. त्यावर वरच्या बाजुला डाव्या कोपऱ्यात भगव्या गोलात कमळ आणि खालच्या बाजुला उजव्या कोपऱ्यात भाकरी ही चिन्हे होती.स्वातंत्र्याच्या लढ्याला संपूर्ण देशात एकाच संस्थेमार्फत दिशा मिळावी. म्हणून 1885 मध्ये काँग्रेसची स्थापना झाली. या संस्थेमार्फत देशात विविध ठिकाणी जनजागृती मेळावे, सभा, अधिवेशने होऊ लागली. त्याकाळात प्रथमच स्वतंत्र भारताचा ध्वज कसा असावा याची चर्चा सुरू झाली. याच दरम्यान 1905 मध्ये वंग भंग ही चळवळ सुरु झाली. या चळवळीत क्रियाशील असलेल्या स्वामी विवेकानंदाच्या शिष्या भगिनी निवेदिना यांनी प्रथमच चौरस आकाराचा भगवा ध्वज, या ध्वजाच्या मध्यभागी व्रज स्वरुप चिन्ह आणि वंदे मातरम ही अक्षरे लिहिलेली होती. तसेच ध्वजाच्या चारही बाजुला दिव्यांचे चित्र होते. हा ध्वज फारसा वापरला गेला नाही.1906 मध्ये कलकत्यामध्ये झालेल्या एका जनसभेत आयताकृती हिरवा (सर्वात वर त्यावर 8 पांढरी फुले), पिवळा (मध्यमागी त्यावर वंदे मातरम्अशी अक्षरे) आणि लाल (खालच्या बाजुला त्यावर सूर्य आणि चंद्र) असे तीन रंगांचे पट्टे असलेला एक ध्वज फडकविला गेला. History of Tiranga 22 ऑगस्ट 1907 मध्ये जर्मनीत आंतरराष्ट्रीय समाजवादी काँग्रेसचा मेळाव्यात मॅडम कामा (kama)यांनी वर उल्लेख केलेल्या रंगसंगतीमधील फक्त चिन्हांमध्ये थोडासा बदल असलेला ध्वज फडकविला. त्यानंतर गदर पार्टीनेही ही रंगसगती कायम ठेवताना त्यातील सर्व चिन्हे काढून त्या ठिकाणी दोन तलवारी असलेला ध्वज तयार केला होता. होमरुल  चळवळीच्या  काळात  1917  मध्ये  ॲनी बेझंट  (Annie Besant) यांनीही  एक  वेगळा  ध्वज ...

Dr. Vinay Natu's attack

काँग्रेस का हाथ, भ्रष्ट परिवार के साथ

भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांचा हल्लाबोल गुहागर, ता.15 : देशातील स्वातंत्र्यसैनिकांनी स्थापन केलेल्या असोसिएटेड जर्नल लि. (Associated Journal Ltd.) या कंपनीची दोन हजार कोटींची मालमत्ता हडप करणाऱ्या ...