खातू मसाले ला Idol of Maharashtra पुरस्कार
कोल्हापूरात शाळीग्राम व सौ. प्रतिभा खातूंचा गौरव गुहागर, ता. 13 : कोकणातील घराघरात पोचलेल्या गुहागर मधील खातू मसाले उद्योग समुहाला आयडॉल ऑफ महाराष्ट्र (Khatu Masale Idol of Maharashtra) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोकण विभागासाठीच्या या पुरस्काराचे वितरण नुकतेच कोल्हापूरमध्ये झाले. खातू मसाले उद्योग समुहाचे संस्थापक शाळीग्राम तथा बंधु खातू आणि सौ. प्रतिभा खातू यांना सुप्रसिध्द महाराष्ट्रीय हॉटेल व्यावसायिका जयंती कठाळे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. Khatu Masala Idol of Maharashtra गणेशोत्सवाच्या प्रारंभी कोल्हापूरमधील हॉटेल सयाजीमध्ये आयडॉल ऑफ महाराष्ट्र (फूड ॲण्ड रेस्टॉरंट) हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला पूर्णब्रह्म या महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृतिचा प्रसारासाठी वाहिलेल्या हॉटेल उद्योगाच्या संस्थापिका जयंती कठाळे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. Khatu Masala Idol of Maharashtra परिचय जयंती कठाळे यांचा ...