जिल्ह्यात दि.1 ते 7 ऑगस्ट महसूल सप्ताह
जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह रत्नागिरी, दि. 29 : 1 ऑगस्ट हा राज्यभर महसूल दिन म्हणून साजरा करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यानिमित्ताने जिल्ह्यात 1 ते 7 ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह ...
जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह रत्नागिरी, दि. 29 : 1 ऑगस्ट हा राज्यभर महसूल दिन म्हणून साजरा करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यानिमित्ताने जिल्ह्यात 1 ते 7 ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह ...
महिन्यातील जेमतेम १५ दिवसच सेवा गुहागर, ता. 29 : गेले ३/४ दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळित झालेले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही मुसळधार पावसामुळे सर्वच नद्या दुथडी भरुन वहात आहेत. अशातच ...
गायब मुलींची संख्या 2 लाखांहून अधिक दिल्ली, ता. 29 : गेल्या काही काळात देशभरात मध्य प्रदेश, पश्चिम बंगालसारख्या काही राज्यांमधून मुले चोरीला जाण्याची किंवा हरवल्याची अनेक प्रकरणे समोर आली. देशभरातील ...
गुहागर, ता. 29 : प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांना आणखी एक सन्मान मिळाला आहे. महाराष्ट्र राज्याचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार टाटा यांना जाहीर करण्यात आला आहे. राज्याचे ...
मनसे पदाधिकाऱ्यांना आरजीपीपीएल अधिकाऱ्यांचे आश्वासन गुहागर, ता. 28 : तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस अॅन्ड पॉवर कंपनीतील ठेकेदाराने येथे काम करणा-या कामगारांचा १ जुन पासुन पगार व गेटपास न दिल्याने ...
पंचप्राणप्रतिज्ञा आणि “मेरी माटी मेरा देश” अभियानाचे उद्घाटन गुहागर, ता. 28 : खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात भारत सरकार आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने कारगिल विजय दिनानिमित्त पंचप्राणप्रतिज्ञा आणि “मेरी माटी मेरा ...
दि. ३० रोजी कुणबी समाजोन्नती संघ व कुणबी पतसंस्थेचा स्तुत्य उपक्रम संदेश कदम, आबलोली,गुहागर, ता. 28 : कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा तालुका गुहागर (ग्रामिण) आणि गुहागर तालुका कुणबी नागरी ...
कालपासून मुसळधार पाऊस; चाकरमान्यांचे हाल मुंबई, ता. 28 : मुंबईत पावसामुळे सकाळपासूनच लोकल रेल्वे सेवेला फटका बसला आहे. पावसामुळे अनेक स्थानकांत रेल्वे रुळांवर पाणी साचलंय. यामुळे तिन्ही मार्गांवरील रेल्वे सेवा ...
शिरीष दामले, रत्नागिरी; मो. 9423875402तत्त्व, निष्ठा, बांधिलकी या शब्दांशी बहुतांश समाजाने फारकत घेतलेल्या सध्याच्या वातावरणात निष्ठा हे मूल्य मानून त्याप्रमाणे आयुष्य व्यतीत केलेल्या बापूसाहेब परूळेकर यांची माहिती सध्याच्या पिढीला नसणे ...
नवी दिल्ली, ता. 27 : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) केंद्र सरकारविरुद्ध विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. विरोधकांच्यावतीने खासदार गौरव गोगोई यांनी हा प्रस्ताव दिला. या प्रस्तावासोबत दिलेल्या 50 खासदारांच्या सह्यांची ...
गुहागर, ता. 27 : श्रीदेव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिरमधील राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षेमध्ये दोन विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय गुणवत्ता यादी मध्ये निवड व नऊ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. Guhagar High ...
शेखर विचारे, अशोक देवळे, अनंत रांगळे बक्षिसाचे मानकरी गुहागर, ता. 26 : राज्यस्तरीय खरीप पिक स्पर्धेचा निकाल (Kharip Crop Competition Result) जाहीर झाला असून नाचणी पिक स्पर्धेत ठाणे विभागात गुहागर तालुक्यातील शेखर विचारे, वरवेली यांनी प्रथम क्रमांक मिळवला. तर अशोक देवळे, अडूर यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. भात पीक स्पर्धेत जिल्हास्तरावर अनंत भिवाजी रांगळे, पोमेंडी यांनी प्रथम क्रमांक मिळवला. Kharip Crop Competition Result राज्य सरकारने सन 2022-23 या वर्षात खरीप पिक स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये राज्य, विभाग, जिल्हा व तालुका अशा चार स्तरांवर क्रमांक काढण्यात येणार होते. प्रत्येक स्तरावरील सरासरी पिकापेक्षा जास्त पिक घेणारे शेतकरीच त्या स्तरासाठी पात्र होतील. तसेच ज्या स्तरासाठी शेतकरी पात्र झाला असेल त्या खालील स्तरावर त्या शेतकऱ्याच्या नावाचा विचार केला जाणार नाही. या स्पर्धेच्या महत्त्वाच्या अटी होत्या. भात उत्पादनामध्ये गुहागर तालुक्यातील शेतकरी राज्य आणि विभाग स्तरासाठी पात्र ठरले नाहीत. मात्र जिल्हास्तरासाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांमध्ये गुहागर तालुक्यातील पोमेंडीचे शेतकरी अनंत भिवाजी रांगळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांनी आपल्या शेतात 87.38 किलो प्रति गुंठा या प्रमाणात भात उत्पादित केले. त्यांना रोख रु. 10 हजार व सन्मानपत्र देवून गौरविण्यात येणार आहे. Kharip Crop Competition Result भात उत्पादनामध्ये गुहागर तालुक्याचे सरासरी क्षेत्र 3889 असून सरासरी 30.75 किलो प्रति गुंठा भात उत्पादन होते. यापेक्षा जास्त उत्पादन घेणारे आणखी तीन शेतकरी तालुकास्तरावरील स्पर्धेत यशस्वी झाले. तालुकास्तरावरील स्पर्धेत तळवली येथील नीलेश दामोदर पवार यांनी 66.72 किलो प्रति गुंठा भात उत्पादन करत प्रथम क्रमांक मिळवला. त्यांना रु. ...
प्रथम श्रेणीत उत्तीर्ण, गायनकलेचा प्रसार करणार गुहागर, ता. 26 : शहरातील चैताली बाजारच्या संचालिका सौ. सुविधा चिन्मय ओक यांनी संगीत विशारद ही पदवी मिळवली आहे. मे 2023 मध्ये अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय (All India Gandharva College) मंडळाने घेतलेल्या परीक्षेत त्यांना प्रथम श्रेणी मिळाली आहे. गुहागरमध्ये गायन कलेचा प्रसार करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. Sangit Visharad_Suvidha Oak लहानपणापासून गायन कलेची आवड असलेल्या सौ. सुविधा ओक (माहेरच्या सुविधा करमकर) साताऱ्यात असताना प्रारंभिक ते उपांत्य विशारद या परीक्षा प्रथम श्रेणीतच उत्तीर्ण झाल्या होत्या. तिथे झालेल्या अनेक गायनस्पर्धांमध्येही त्यांनी बक्षिसे मिळवली. मात्र विवाहानंतर गुहागरमध्ये संगीत शिक्षणाची सोय नसल्याने त्यांचे शिक्षण थांबले होते. या काळातही त्यांचा रियाज सुरु होता. गुहागरमधील कलाविकास या नाट्यसंस्थेच्या संगीत शारदा मधील इंदिरा, संगीत कान्होपात्रा मधील शिलवती, संगीत एकच प्याला मधील सिंधू अशा विविध भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी काम केलेल्या संगीत शारदा या नाट्यकृतीला राज्यस्तरीय स्पर्धेत अनेक बक्षिसे मिळाली. गुहागर वरचापाट येथील कोपरी नारायण देवस्थान आयोजित संगीत नाट्यप्रवेश स्पर्धेतही त्यांनी काम केलेल्या कट्यार काळजात घुसली नाटकातील रागमालेच्या प्रवेशाला बक्षिस मिळाले. Sangit Visharad_Suvidha Oak लग्नानंतर तब्बल 11 वर्षांनी पुन्हा एकदा चिपळूणला महेशकुमार देशपांडे यांच्याकडे संगीत शिक्षणासाठी सौ. सुविधा ओक यांनी प्रवेश घेतला. मात्र कोरोनामुळे त्यामध्येही खंड पडला. तरीही चिकाटी न सोडता कोरोनानंतर त्यांनी पुन्हा एकदा शिक्षण सुरु केले. आणि मे 2023 मध्ये अखिल भारतीय गांधर्व विद्यालय मंडळाची संगीत विशारद ही परीक्षा त्यांनी दिली. या परीक्षेत त्या प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहेत. Sangit Visharad_Suvidha Oak या सांगितिक प्रवासाबद्दल सौ. सुविधा ओक म्हणाल्या की, गुहागरसारख्या तालुक्यात संगीताचे विशेषत: नाट्यसंगीताचे वेड असलेली मंडळी आहेत. प्रत्येक गावात भजन मंडळे आहेत. मात्र येथे गाण्याची, वादनाची आवड असलेल्यांना शास्त्रीय संगीताचे शिक्षण मिळण्याची सोय नाही. ही उणीव असल्याने विवाहापूर्वी उपांत्य विशारद पर्यंत पोचुनही संगीत विशारद ही पदवी मिळविण्यासाठी 14 वर्ष वाट पहावी लागली. आता गायनाची आवड असलेल्यांना शास्त्रीय शिक्षण मिळण्यासाठी मी स्वत: संगीत विद्यालय सुरु करणार आहे. स्वरानंद या संगीत विद्यालयाद्वारे सुरवातीला गायनाचे शिक्षणाची सोय उपलब्ध होईल. भविष्यात हार्मोनियम, तबला आदी शिक्षणाची व्यवस्था उभी करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. Sangit Visharad_Suvidha Oak
तोडण्यासाठी प्रभागनिहाय पथके तयार करणार; मंत्री उदय सामंत गुहागर, ता. 26 : पावसाळ्यात वादळवाऱ्याने वृक्ष पडणे, फांद्या तुटल्याने स्थानिक रहिवासी आणि मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी मुंबई शहर आणि उपनगरमध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून ...
प.पू.डॉ. मोहनजी भागवत, मदनदासजी देवी यांचे सोमवारी बेंगळूर येथे निधन पुणे, ता. 26 : आपल्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला विचारांनी आणि आंतरिक स्नेहाने प्रेरित करून कोणत्या ना कोणत्या कामात सामाजिक ...
संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 26 : तालुक्यातील कुणबी समाजाचे दैवत आणि श्रद्धास्थान, उध्दारकर्ते, लोकनेते, माजी आमदार, स्वर्गीय रामभाऊ बेंडल यांचा २९ वा स्मृतीदिन साजरा करण्यात आला. गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी ...
एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मिडीयम स्कूल आबलोलीचा माजी विद्यार्थी गुहागर, ता. 25 : तालुक्यातील चंद्रकला फाउंडेशन संचालित एक्सलंट अकेडमी इंग्लिश मिडीयम स्कूल आबलोलीचा माजी विद्यार्थी कुमार सोहम प्रकाश गुरसळे हा JEE 2023 परीक्षेत General गटात 4322 ...
गुहागर, ता. 25 : तालुक्यातील एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मिडीयम स्कूल आबलोलीच्या प्रशालेतील इयत्ता पाचवी मधील कु. रुद्र ऋषिकांत पवार याने 300 पैकी 228 गुण मिळवून ग्रामीण गुणवत्ता यादीत चौथा तर ...
मुंबई, ता. 26 : मुर्तिकारांच्या रोजगाराला प्राधान्य देऊन राज्य सरकारने यंदा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती तयार करण्यास बंदी घातली नाही. मात्र, मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करणे बंधनकारक केले आहे. त्यासाठी सर्व ...
दि. २३ जुलैपासून ते ६ ऑगस्टपर्यंत पर्यटकांना बंदी गुहागर, ता. 26 : सध्या सुरु असणारा मुसळधार पाऊस व दरडी कोसळण्याचा धोका पाहाता परशुराम घाटाच्या पायथ्यालगत असणारा सवतसडा धबधबा व अडरे ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.