Tag: A party is a means of working

A party is a means of working

युवा महोत्सवामुळेच राजकारणात यशस्वी; मंत्री उदय सामंत

पक्ष हे काम करण्याचे माध्यम गुहागर, ता. 06 : राजकीय पक्ष हे काम करण्याचे माध्यम आहे. निवडणूका लागल्यावर राजकारण करु, एकमेकांचे कपडे फाडू. मात्र त्यानंतर विकासासाठी सर्वांनी एकत्र आले पाहीजे. गुहागर तालुक्याच्या विकासासाठी पालकमंत्री म्हणून मी वारंवार गुहागरमध्ये येत राहीन. असे प्रतिपादन रत्नागिरीचे पालकमंत्री व राज्याचे उदयोग मंत्री उदय सामंत यांनी केले. ते गुहागरमध्ये किनारा युवा महोत्सवात बोलत होते. A party is a means of working रत्नागिरीचे पालकमंत्री व राज्याचे उदयोग मंत्री उदय सामंत आंगणेवाडीतील दौरा संपल्यावर रात्री उशिरा गुहागरमध्ये किनारा महोत्सवाला भेट देण्यासाठी आले. यावेळी लोकनेते स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठान यांच्यावतीने साहिल आरेकर व सिद्धेश आरेकर यांनी सत्कार केला. यावेळी प्रास्ताविक करताना साहिल आरेकर म्हणाले की, किनारा युवा महोत्सवाची प्रेरणा उदय सामंत यांच्या बहर युवा महोत्सवातून घेतली. तरुणांना सोबत घेवून जाणारा नेता म्हणून उदय सामंत यांचा अभिमान वाटतो. म्हणूनच पहिल्या युवा महोत्सवाचे उद्‌घाटन उदय सामंत यांच्या हस्ते व्हावे अशी इच्छा होती. परंतु गेली तीन चार वर्ष गुहागरमध्ये कोणी नेते सहज येण्यास तयार नसायचे. आज मात्र चित्र बदलले. आमदार शेखर निकम आणि मंत्री उदय सामंत दोघेही किनारा युवा महोत्सवाला भेट देण्यासाठी आले. A party is a means of working हाच धागा पकडून पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, माझ्या राजकीय जीवनाची सुरवात युवा महोत्सवापासून झाली. बहरमधुन अनेक कलाकार आम्ही राज्यातील सांस्कृतिक, कला क्षेत्राला दिले. त्याचबरोबर विकासाची कामे आम्ही सुरु केली.  सामाजिक क्षेत्रात काम करताना ज्यावेळी आपण ठसा उमटवतो त्यावेळी आपले विरोधकही तयार होत असतात. मी वयाच्या 28 व्या वर्षी पहिल्यांदा विधानसभा लढवली. तेव्हा बहरच्या माध्यमातून नाचगाण्याचे कार्यक्रम करणारा आणि क्रिकेट खेळणार आमदार कसा असु शकतो असा अपप्रचार माझ्याच काही मित्रांनी सुरु केला. परंतु बहर आणि क्रिकेटमधुन व्यासपीठ दिले त्या तरुणाईनेच उठाव केला आणि मला आमदार केले. A party is a means of working ...