“महापशुधन एक्स्पो-2023” चे आयोजन
पशुसंवर्धन विभागाच्या वतीने; जिल्ह्यातील पशुपालकांनी लाभ घ्यावा रत्नागिरी ता. 23 : शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने दि. 24 ते 26 मार्च 2023 दरम्यान शिर्डी ता. राहता, जि.अहमदनगर येथे महापशुधन एक्स्पो- 2023 ...
पशुसंवर्धन विभागाच्या वतीने; जिल्ह्यातील पशुपालकांनी लाभ घ्यावा रत्नागिरी ता. 23 : शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने दि. 24 ते 26 मार्च 2023 दरम्यान शिर्डी ता. राहता, जि.अहमदनगर येथे महापशुधन एक्स्पो- 2023 ...
शीर भाटले आंबेकर वाडीची व्यथा गुहागर, ता. 23 : निवडणुका झाल्यावर नेते आश्र्वासने विसरतात. त्याचप्रमाणे वाडीचा पक्षप्रवेश झाल्यावर नारळ का फोडला हे पण नेते विसरले. मात्र त्याचा भुर्दंड आज तेथील कार्यकर्ता भोगत आहे. नेत्याच्या शब्दांवर विश्र्वास ठेवून, उधारीवर माल आणून बांधकाम झाले. पण गेल्या दोन वर्षात हा हिशोब पूर्ण करायचाच नेते विसरुन गेलेत. व्यापारी आणि कामगार मात्र उधारी आणि मेहनतान्यांच्या पैशांसाठी या कार्यकर्त्यामागे लागले आहेत. Sadness of Sheer Bhatle Ambekar Wadi ही कथा आहे गुहागर तालुक्यातील शीर भाटले आंबेकरवाडीची. शृंगारतळी आबलोली रस्त्यावर भाटले आंबेकरवाडी आहे. या वाडीला प्रवासी निवारा शेड बांधुन हवी होती. आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एका पक्षाच्या तालुका आणि जिल्हाच्या मुख्य पदाधिकाऱ्यांनी आंबेकर वाडीला पक्षप्रवेशाची गळ घातली. प्रवासी निवारा शेडचा संपूर्ण खर्च देतो असे गाजर दाखवले. आंबेकरवाडीतील ग्रामस्थ आजपर्यंत ज्या पक्षाच्या पाठीशी कायम उभे होते त्यांनी असे काहीच दिले नव्हते. आपले काम होत असेल, आपल्या मुलाबाळांना, लेकी सुनांना गाडीची वाट पहात उन्हात थांबावे लागणार नसेल तर या पक्षात जायला काय हरकत आहे. असा सूर बहुतेक वाडकऱ्यांनी लावला आणि प्रवासी निवारा शेडच्या बदल्यात वाडीचा पक्षप्रवेश निश्चित झाला. आंबेकर वाडीतील बबन सोनु आंबेकर यांनी जमीन देण्याचे कबुल केले. Sadness of Sheer Bhatle Ambekar Wadi सदर पक्षाच्या तालुका आणि जिल्ह्याचे मुख्य पदाधिकारी ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वेळी आपल्या कार्यकर्त्यांच्या ताफ्यासह भाटले आंबेकरवाडीत आले. प्रवासी निवारा शेडच्या भूमिपूजनाचा नारळ फोडण्यात आला. वाडीच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. मतांच्या गणितात भर पडल्याने नेते खुशीत होते. आपली मागणी पूर्ण होणार म्हणून ग्रामस्थ खुशीत होते. प्रवासी निवारा शेडच्या कामाला सुरवात झाली. साहेब आज चिरा आणि सिमेंट आले. थोडा चिरा कमी पडतोय. बांधकाम पूर्ण होत आलाय. रंग कोणता लावायचा. असे रोज फोन साहेबांना जात होते. साहेब फोनवरुनच मार्गदर्शन करत होते. अखेर मार्च 2020 मध्ये प्रवासी निवारा शेड बांधुन पूर्ण झाली. निवारा शेडवर नवतरुण विकास मंडळ आणि महिला विकास मंडळ शीर भाटले आंबेकरवाडीचा फलक झळकला. जमीन देणारे बबन सोनु आंबेकर यांचे नाव काळा पाटीवर सुवर्णाक्षरात लिहिले गेले. Sadness of Sheer ...
महाज्योती अंतर्गत पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने नागपूर ता. 23 :- महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्याथ्यांकडून MHT-CET/ JEE /NEET 2025 करीता पुर्व प्रशिक्षण ...
गुहागर, ता. 21 :महाराष्ट्रातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना येत्या गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या सण-उत्सवानिमित्त ‘आनंदाचा शिधा’ वितरीत करण्यात येणार असल्याचा निर्णय शासनाने यापूर्वीच घेतला असून उद्या (दि. ...
रत्नागिरी, ता. 21 : महिला घरसंसार सांभाळून लघुउद्योग करत आहेत. महिलांना एकत्र आणून व्यासपीठ देण्याचे काम सामाजिक कार्यकर्त्या प्राची शिंदे करत आहेत. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायला हव्यातच. पण त्यांच्या कलागुणांना संधी ...
नगराध्यक्ष राजेश बेंडल, हरकती व सूचनांची संधी गमावली असती गुहागर, ता. 21 : नगरपंचायतीने प्रसिध्द केलेल्या विकास आराखड्यामुळे विकासाच्या मर्यादा कमी केल्या आहेत. तरीही हरकती व सूचनांचा नागरिकांचा हक्क अबाधित रहावा. ...
गुहागर, ता. 21 : गेली अनेक वर्ष श्रेयस नर्सिंग होमद्वारे डॉ. सुरेश भाले आणि सौ. स्वप्नाली भाले रुग्णसेवा देत आहेत. आता याच दांम्पत्याने गुहागर तालुकावासीयांसाठी सोनोग्राफीची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. श्रेयस सोनाग्राफी सेंटरचे उद्घाटन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शृंगारतळीत होत आहे. Inauguration of Sonography Center at Sringaratali गुहागरमध्ये गेली 25 वर्ष वैद्यकिय सेवा देणारे डॉ. सुरेश भाले व डॉ. सौ. स्वप्नाली भाले यांनी गरोदरपणात आवश्यक असणारी सोनोग्राफी प्रथमगुहागरमध्ये सुरु केली. आता 3 डी, 4 डी, अल्ट्रा सोनोग्राफीची सेवा डॉ. भाले शृंगारतळीत सुरु करत आहेत. त्यासाठी त्यांनी अत्याधुनिक सोनोग्राफी यंत्र आणले आहे. या अत्याधुनिक यंत्रप्रणालीमुळे गरोदरपणातील आवश्यक सोनाग्राफीबरोबरच कलर ड्रापलर, एन.टी. स्कॅन, आदी अनेक प्रकारच्या सोनाग्राफी गुहागरवासीयांना श्रृंगारतळीत करता येणार आहेत. Inauguration of Sonography ...
गुहागर, ता. 21 : चिपळूण तालुका पतसंस्था फोरम व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. संस्था प्रतिनिधी यांच्यासाठी अद्ययावत सहकारी कायदा, नियम ...
२४ मार्च 2023 रोजी; कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज यांची उपस्थिती गुहागर, ता. 21 : तालुक्यातील क्षत्रिय मराठा युवा संघटना गुहागर तर्फे मराठा प्रिमियर लीग २०२३ क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या ...
नेमकं सरकारनं काय आश्वासन दिलं! गुहागर, ता. 21 : मुख्यमंत्र्यांसोबत सरकारी कर्मचारी संघटनेच्या बैठकीनंतर जून्या पेन्शन योजनेचा तिढा सुटला असून शासकीय कर्मचाऱ्यांनी गत सात दिवसांपासून पुकारलेला संप मागे घेतला आहे. ...
गुहागर, ता. 21 : केंद्रीय राखीव पोलीस दलात (सीआरपीएफ) 9212 जागांसाठी पुरुष महिला साठी भरतीप्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारांना खालील सविस्तर जाहिरात वाचून, शैक्षणिक-शारीरिक पात्रता तपासून ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी शैक्षणिक ...
भाजपचा विकासकामांचा धडाका रत्नागिरी, ता. 20 : तालुक्यातील धामणसें गावात भारतीय जनता पक्षाने निवडणुकीवेळी विकासकामांचा शब्द दिला होता. त्यानुसार आता पहिले मोठे विकासकाम मंजूर झाले आहे. हटवाडी, चौकेवाडी, बौद्धवाडी, खरवते ...
गुहागर, ता. 20 : तालुक्यातील अडूर येथील श्री विठ्ठलाईदेवीच्या वार्षिक कार्यक्रमाच्या शताब्दी महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून पाच दिवसीय विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. या कालावधील शतचंडी जपानुष्ठान व चंडीयाग तसेच ...
रत्नागिरी, ता. 20 : गुढीपाडव्याला यंदा १९ व्या वर्षी रत्नागिरी येथे हिंदू नववर्ष स्वागतयात्रा मोठ्या जल्लोषात काढण्यात येणार आहे. ग्राममंदिर श्री देव भैरी मंदिर ते समाजमंदिर श्री पतितपावन मंदिरापर्यंत निघणाऱ्या ...
ऑफशिअल जगप्रसिद्ध आदित्य म्युझिक चॅनेलवर पाहता येणार गुहागर, ता. 20 : तालुक्यातील जानवळे गावचे सुपुत्र गीतकार, संगीतकार शशांक सुर्यकांत कोंडविलकर यांनी पुष्पा चिञपटातील ऊ अंटावा या गाण्याचे मराठीत रुपातंर केले ...
गुहागर, ता. 20 : केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुपालन आणि दुग्धव्यवसाय विभागाअंतर्गत मत्स्यविभाग आणि कर्नाटक, गोवा या राज्यांचे मत्स्यविभाग, तसेच भारतीय तटरक्षक दल, भारतीय मत्स्य सर्वेक्षण आणि मच्छिमार प्रतिनिधी अशा सर्वांच्या सहभागातून, गोव्यात मुरगाव बंदरावर सागर परिक्रमा ...
15 ऑगस्टपर्यंत, देशभरात, 1,000 खेलो इंडिया केंद्रे सुरु केली जातील - मंत्री अनुराग ठाकूर गुहागर, ता. 20 : ओटीटी प्लॅटफॉर्म वर दाखवल्या जाणाऱ्या कार्यक्रमात, अश्लीलता आणि असभ्य भाषेच्या वाढत्या वापराबद्दल केंद्र ...
द्विशतकी घरटी संरक्षित आणि एकाच वेळी 162 पिल्ले समुद्रात गुहागर, ता. 19 : येथील कासव संवर्धन केंद्रात 19 मार्चला संरक्षित केलेल्या कासवांच्या घरट्यांची संख्या 200 झाली आहे. एका हंगामात एवढी ...
रत्नागिरी, ता. 18 : राज्यातील सर्व नागरिकांना परवडणाऱ्या व उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात, हे राज्य शासनाचे उद्दिष्ट असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहेत, असे ...
रत्नागिरी येथे २४ मार्चला मोफत समुपदेशन कार्यक्रम रत्नागिरी, ता. 18 : इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या व सर्व विद्यार्थी, पालकांसाठी शिरगावच्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने येत्या २४ मार्चला मोफत ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.