Tag: गुहागर मराठी बातम्या

Sangit Visharad_Suvidha Oak

संगीत विशारद परीक्षेत सौ. सुविधा ओक यशस्वी

प्रथम श्रेणीत उत्तीर्ण, गायनकलेचा प्रसार करणार गुहागर, ता. 26 : शहरातील चैताली बाजारच्या संचालिका सौ. सुविधा चिन्मय ओक यांनी संगीत विशारद ही पदवी मिळवली आहे. मे 2023 मध्ये अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय (All India Gandharva College) मंडळाने घेतलेल्या परीक्षेत त्यांना प्रथम श्रेणी मिळाली आहे. गुहागरमध्ये गायन कलेचा प्रसार करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. Sangit Visharad_Suvidha Oak लहानपणापासून गायन कलेची आवड असलेल्या सौ. सुविधा ओक (माहेरच्या सुविधा करमकर) साताऱ्यात असताना प्रारंभिक ते उपांत्य विशारद या परीक्षा प्रथम श्रेणीतच उत्तीर्ण झाल्या होत्या. तिथे झालेल्या अनेक गायनस्पर्धांमध्येही त्यांनी बक्षिसे मिळवली. मात्र विवाहानंतर गुहागरमध्ये संगीत शिक्षणाची सोय नसल्याने त्यांचे शिक्षण थांबले होते. या काळातही त्यांचा रियाज सुरु होता.  गुहागरमधील कलाविकास या नाट्यसंस्थेच्या संगीत शारदा मधील इंदिरा, संगीत कान्होपात्रा मधील शिलवती, संगीत एकच प्याला मधील सिंधू अशा विविध भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी काम केलेल्या संगीत शारदा या नाट्यकृतीला राज्यस्तरीय स्पर्धेत अनेक बक्षिसे मिळाली. गुहागर वरचापाट येथील कोपरी नारायण देवस्थान आयोजित संगीत नाट्यप्रवेश स्पर्धेतही त्यांनी काम केलेल्या कट्यार काळजात घुसली नाटकातील रागमालेच्या प्रवेशाला बक्षिस मिळाले. Sangit Visharad_Suvidha Oak लग्नानंतर तब्बल 11 वर्षांनी पुन्हा एकदा चिपळूणला महेशकुमार देशपांडे यांच्याकडे  संगीत शिक्षणासाठी सौ. सुविधा ओक यांनी प्रवेश घेतला. मात्र कोरोनामुळे त्यामध्येही खंड पडला. तरीही चिकाटी न सोडता कोरोनानंतर त्यांनी पुन्हा एकदा शिक्षण सुरु केले. आणि मे 2023 मध्ये अखिल भारतीय गांधर्व विद्यालय मंडळाची संगीत विशारद ही परीक्षा त्यांनी दिली. या परीक्षेत त्या प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहेत. Sangit Visharad_Suvidha Oak या सांगितिक प्रवासाबद्दल सौ. सुविधा ओक म्हणाल्या की, गुहागरसारख्या तालुक्यात संगीताचे विशेषत: नाट्यसंगीताचे वेड असलेली मंडळी आहेत. प्रत्येक गावात भजन मंडळे आहेत. मात्र येथे गाण्याची, वादनाची आवड असलेल्यांना शास्त्रीय संगीताचे शिक्षण मिळण्याची सोय नाही. ही उणीव असल्याने विवाहापूर्वी उपांत्य विशारद पर्यंत पोचुनही संगीत विशारद ही पदवी मिळविण्यासाठी 14 वर्ष वाट पहावी लागली. आता गायनाची आवड असलेल्यांना शास्त्रीय शिक्षण मिळण्यासाठी मी स्वत: संगीत विद्यालय सुरु करणार आहे. स्वरानंद या संगीत विद्यालयाद्वारे सुरवातीला गायनाचे शिक्षणाची सोय उपलब्ध होईल. भविष्यात हार्मोनियम, तबला आदी शिक्षणाची व्यवस्था उभी करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. Sangit Visharad_Suvidha Oak

सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील वृक्ष धोकादायक

सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील वृक्ष धोकादायक

तोडण्यासाठी प्रभागनिहाय पथके तयार करणार; मंत्री उदय सामंत गुहागर, ता. 26 : पावसाळ्यात वादळवाऱ्याने वृक्ष पडणे, फांद्या तुटल्याने स्थानिक रहिवासी आणि  मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी मुंबई शहर आणि उपनगरमध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून ...

Madandasji Devi passed away in Bangalore

मदनदासजींच्या सुत्रानुसार कार्य पुढे नेऊया

प.पू.डॉ. मोहनजी भागवत, मदनदासजी देवी यांचे सोमवारी बेंगळूर येथे निधन पुणे, ता. 26 : आपल्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला विचारांनी आणि आंतरिक स्नेहाने प्रेरित करून कोणत्या ना कोणत्या कामात सामाजिक ...

Commemoration of late Rambhau Bedal at Abaloli

आबलोली येथे स्वर्गीय रामभाऊ बेडल यांचा स्मृतीदिन साजरा

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 26 : तालुक्यातील कुणबी समाजाचे दैवत आणि श्रद्धास्थान, उध्दारकर्ते, लोकनेते, माजी आमदार, स्वर्गीय रामभाऊ बेंडल यांचा २९ वा स्मृतीदिन साजरा करण्यात आला. गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी ...

Soham Gursale success in JEE exam

जेईई परीक्षेत सोहम गुरसळे याचे यश

एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मिडीयम स्कूल आबलोलीचा माजी विद्यार्थी गुहागर, ता. 25 : तालुक्यातील चंद्रकला फाउंडेशन संचालित एक्सलंट अकेडमी इंग्लिश मिडीयम स्कूल आबलोलीचा माजी विद्यार्थी कुमार सोहम प्रकाश गुरसळे हा JEE 2023 परीक्षेत General गटात 4322 ...

Aabaloli Excellent Academy Student Merit List

आबलोली एक्सलंट अकॅडमी स्कूलचे विद्यार्थी गुणवत्ता यादीत

गुहागर, ता. 25 :  तालुक्यातील एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मिडीयम स्कूल आबलोलीच्या प्रशालेतील इयत्ता पाचवी मधील कु. रुद्र ऋषिकांत पवार याने 300 पैकी 228 गुण मिळवून ग्रामीण गुणवत्ता यादीत चौथा तर ...

Plaster of Paris Ganesha idols allowed

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींना परवानगी

मुंबई, ता. 26 : मुर्तिकारांच्या रोजगाराला प्राधान्य देऊन राज्य सरकारने यंदा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती तयार करण्यास बंदी घातली नाही. मात्र, मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करणे बंधनकारक केले आहे. त्यासाठी सर्व ...

Savatsada Falls and Adare Dam are closed for tourism

सवतसडा धबधबा व अडरे धरण पर्यटनाकरिता बंद

दि. २३ जुलैपासून ते ६ ऑगस्टपर्यंत पर्यटकांना बंदी गुहागर, ता. 26 : सध्या सुरु असणारा मुसळधार पाऊस व दरडी कोसळण्याचा धोका पाहाता परशुराम घाटाच्या पायथ्यालगत असणारा सवतसडा धबधबा व अडरे ...

Tree plantation by Lions Club and Jeevanshree Pratishthan

लायन्स क्लब व जीवनश्री प्रतिष्ठान तर्फे वृक्षारोपण

झाडे लावा झाडे जगवा - तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे गुहागर, ता. 25 : वनसंवर्धन दिनाचे औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटी आणि जीवनश्री प्रतिष्ठान गुहागर यांच्या वतीने शहरातील अनेक ...

Inclusion of 40 Indian sites in UNESCO World Heritage List

जागतिक वारसा यादीत भारताच्या 40 स्थळांचा समावेश

दिल्‍ली, ता. 25 : भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) राष्ट्रीय संरक्षण धोरण, 2014 नुसार केंद्रीय संरक्षित स्मारकांच्या संवर्धनासाठी स्वतःच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करते. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) च्या अधिकार क्षेत्रात 3696 ...

Raut felicitated by Pension Organization Service Committee

पेंशन संघटना सेवा समितीतर्फे प्रशांत राऊत यांचा सत्कार

गुहागर, ता. 25 : येथील गटविकास अधिकारी प्रशांत राऊत यांची राज्य सरकारच्या ग्रामविकास मंत्रालयाने उत्कृष्ट गटविकास अधिकारी म्हणून निवड केली आहे. त्याबद्द्ल महाराष्ट्र राज्य पेंशन संघटना सेवा समिती गुहागरचे वतीने ...

Sahil Arekar met Sharad Pawar and Supriyatai

साहिल आरेकर यांनी घेतली शरद पवार व सुप्रियाताई यांची भेट

गुहागर, ता. 25 : राष्ट्रवादी युवक काँग्रेस रत्नागिरी जिल्हाध्यक्ष साहिल आरेकर यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष सह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री. शरद पवार व सौ. सुप्रियाताई सुळे यांची भेट घेतली. ...

BJP District President Kedar Sathe felicitation

भाजपचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष केदार साठे यांचा सत्कार

गुहागर, ता. 25 : भारतीय जनता पार्टी गुहागर तालुका वतीने भाजप उत्तर रत्नागिरीचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष केदार साठे यांचा शाल, पुष्पगुच्छ, श्री दुर्गा मातेची प्रतिमा देऊन अभिनंदन व सत्कार करण्यात आला. ...

Veteran colorist Jayant Savarkar No More

ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर यांचे निधन

गुहागर, ता. 24 : 100 हून अधिक मराठी नाटके, 30 हून अधिक हिंदी चित्रपट, मराठी मालिका व चित्रपट यामधून रंगदेवतेची आयुष्यभर सेवा करणारे ज्येष्ठ अभिनेते  जयंत सावरकर यांचे सोमवारी (ता.24) निधन ...

Statement by MNS to Guhagar Agar manager

मनसे तर्फे गुहागर आगार व्यवस्थापक यांना निवेदन

बंद केलेल्या एस.टीच्या फेऱ्या पुन्हा सुरू करा; विनोद जानवळकर गुहागर, ता. 24 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हा अध्यक्ष विनोद जानवळकर यांनी गुहागर एस.टी.आगार व्यवस्थापक यांना बंद केलेल्या एस.टीच्या फेऱ्या पुन्हा ...

Guidance Camp at Gogte-Joglekar College

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात मार्गदर्शन शिबिर संपन्न

अरुअप्पा जोशी अॅकॅडमीतून क्लासवन अधिकारी तयार व्हावेत; जयश्री गायकवाड रत्नागिरी, ता. 24  : पोलिस खात्यात मुलींनी यायचे की नाही, हा खेडेगावांत प्रश्न पडतो. काही जणांना १० ते ५ नोकरी, घरसंसारात ...

Light arrangement at Parashuram Ghat

परशुराम घाटात लाईटची व्यवस्था

घाटात २४ तास लक्ष, यंत्रणा सज्ज गुहागर, ता. 24 : कोकणात पावसाचे थैमान सुरूच आहे. अशात मुंबई-गोवा महामार्गावरील महत्त्वाच्या परशुराम घाटात दरडीचा धोका कायम असल्याने येथे विज व अन्य सुविधा ...

The contract workers in the RGPPL company got justice

..अखेर आरजीपीपीएल कंत्राटी कामगारांना न्याय मिळाला

पगार व गेट पास देणार; अधिकाऱ्यांकडून मनसे पदाधिकाऱ्यांना आश्वासन गुहागर, ता. 22 : तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस अॅन्ड पॉवर कंपनीतील अँकर सिक्युरिटी सर्व्हिस या ठेकेदाराने येथे काम करणा-या कामगारांचा ...

Self defense camp concluded in KDB College

खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात स्वसंरक्षण शिबीर संपन्न

गुहागर, ता. 22 : खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयातील महिला विकास कक्ष (Women Development Cell), राष्ट्रीय सेवा योजना विभाग (National Service Scheme) आणि महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “राजमाता जिजाऊ युवती ...

Dhadak Morcha on Collector Office on 25th

जिल्हाधिकारी कार्यालयावर दि. २५ रोजी धडक मोर्चा

आंबा- काजू बागायतदारांच्या न्याय हक्कासाठी रत्नागिरी, ता. 22 : कोकणातील आंबा- काजू शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी व प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवार दि. २५ जुलै रोजी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर बागायतदारांनी ...

Page 125 of 206 1 124 125 126 206