• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
22 October 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आज ‘एक्सपोसॅट’ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

by Guhagar News
January 1, 2024
in Bharat
45 0
1
Successful launch of 'Exposat' satellite today
88
SHARES
252
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

इस्त्रोची नववर्षाच्या पहिल्याच दिवशी अभिमानास्पद कामगिरी

श्रीहरिकोटा, ता. 01: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी इस्त्रोने अभिमानास्पद कामगिरी केली आहे. सन २०२४ च्या पहिल्याच दिवशी इस्रोने एक्सपोसॅट या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण  केले आहे. या मोहिमेद्वारे कृष्णविवरांसारख्या (ब्लॅक होल) खगोलीय निर्मितीमागील रहस्य उकलण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. Successful launch of ‘Exposat’ satellite today

आज सोमवारी सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी पीएसएलव्ही (PSLV C58) रॉकेटच्या मदतीने XPoSat उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. पुढे सुमारे 22 मिनिटांमध्ये उपग्रह त्याच्या ठरलेल्या कक्षेत प्रस्थापित झाला. सदर उपग्रह अंतराळातील प्रमुख प्रकाश स्त्रोत तसेच कृष्णविवरे यांचा अभ्यास करणार आहे. पीएसएलव्ही उपग्रह ६ डिग्री अँगलला प्रस्थापित करण्यात आलाय. पृथ्वीपासून सुमारे ६५० किलोमीटर उंच अंतरावर हा उपग्रह आहे. सध्या उपग्रह ज्या रॉकेटनेवर पाठला आहे त्याची कक्षा कमी करण्यात आलीये. पुढे आणखी काही वेळासाठी ही मोहीम सुरू राहणार आहे. Successful launch of ‘Exposat’ satellite today

तिरुअनंतपुरम येथील ‘इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी फॉर वूमेन’ने देखील एक उपग्रह विकसीत केला आहे. हा उपग्रह देखील ‘एक्स्पोसॅट’बरोबर प्रक्षेपित करण्यात आला आहे. अतिनील किरणांचा निर्देशांक मोजणे आणि सौर विकिरण असा या उपग्रहाचा मुख्य उद्देश्य आहे. साल २०२४ मधील पहिलीच मोहीम यशस्वी झाल्याने इस्रोवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 2017 मध्ये इस्रोनं हे अभियान सुरू केलं होतं. या मोहिमेचा खर्च 9.50 कोटी रुपये आहे. प्रक्षेपणानंतर सुमारे 22 मिनिटं, एक्सपोसॅट उपग्रह त्याच्या नियुक्त कक्षेत तैनात केला जाईल. या उपग्रहामध्ये दोन पेलोड्स आहेत. पहिला – पोलिक्स आणि दुसरा – एक्सपेक्ट पोलिक्स हा या उपग्रहाचा मुख्य पेलोड आहे. हे रमण संशोधन संस्था आणि यूआर राव सॅटेलाइट सेंटर यांनी संयुक्तपणे तयार केले आहे. 126 किलो वजनाचे हे उपकरण अवकाशातील स्रोतांचे चुंबकीय क्षेत्र, रेडिएशन, इलेक्ट्रॉन इत्यादींचा अभ्यास करेल. हे 8-30 keV श्रेणीच्या ऊर्जा बँडचा अभ्यास करेल. पोलिक्स अवकाशातील 50 पैकी 40 तेजस्वी वस्तूंचा अभ्यास करेल. Successful launch of ‘Exposat’ satellite today

XSPECT म्हणजे, एक्स-रे स्पेक्ट्रोस्कोपी आणि वेळ. ते 0.8-15 keV श्रेणीच्या ऊर्जा बँडचा अभ्यास करेल. म्हणजेच, ते पोलिक्सच्या श्रेणीपेक्षा कमी ऊर्जा बँडचा अभ्यास करेल. हे पल्सर, ब्लॅक होल बायनरी, कमी-चुंबकीय क्षेत्राचे न्यूट्रॉन तारे, मॅग्नेटार इत्यादींचा अभ्यास करेल.भारतीय अंतराळ एजन्सी ISRO व्यतिरिक्त, यूएस स्पेस एजन्सी NASA ने डिसेंबर 2021 मध्ये सुपरनोव्हा स्फोटाचे अवशेष, कृष्णविवरांमधून बाहेर पडणाऱ्या कणांचे प्रवाह आणि इतर खगोलीय घटनांवर असाच अभ्यास केला होता. इस्रोने सांगितले की, क्ष-किरण ध्रुवीकरणाचा अवकाश-आधारित अभ्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचा ठरत आहे आणि या संदर्भात EXPOSACT मिशन महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. Successful launch of ‘Exposat’ satellite today

Tags: Successful launch of 'Exposat' satellite today
Share35SendTweet22
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.