• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
4 February 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

विज्ञान प्रदर्शनात पाटपन्हाळे हायस्कूलचे सुयश

by Ganesh Dhanawade
December 12, 2023
in Guhagar
75 1
2
Success of Patpanhale High School in science exhibition
147
SHARES
420
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 12 : गुहागर तालुकास्तरीय ५१ वे विज्ञान प्रदर्शन आबलोली विद्यालयात नुकतेच संपन्न झाले. या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयाने सुयश संपादन केले. प्राथमिक गटात समृद्धी सुरेश आंबेकर हिची स्मार्ट डस्टबीन व माध्यमिक गटात साई एकनाथ सस्ते याची वायरलेस इलेक्ट्रिक ट्रान्सफर सिस्टीम तसेच दिव्यांग विभागामधील शुभम सुभाष गावडे याच्या केळीचा कोंब ( घड ) काढण्याचे साधन या प्रतिकृतीने तालुक्यात प्रथम क्रमांक संपादन केला. तसेच प्रयोगशाळा सहाय्यक व परिचर प्रायोगिक साधने, माध्यमिक गटातील विद्यार्थी प्रश्नमंजुषा स्पर्धा व भरड धान्य पाककला शिक्षक विभाग यामध्येही पाटपन्हाळे विद्यालयाने सुयश संपादन केले. Success of Patpanhale High School in science exhibition

Success of Patpanhale High School in science exhibition

गुहागर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आबलोली विद्यालयात नुकतेच संपन्न झाले. सदरच्या विज्ञान प्रदर्शनामध्ये प्राथमिक गट व माध्यमिक गट विद्यार्थी प्रतिकृती, अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्य प्राथमिक व माध्यमिक गट, प्रयोगशाळा सहाय्यक व परिचर निर्मित प्रायोगिक साधने या विभागांमध्ये विद्यार्थी व शिक्षक यांनी प्रतिकृती ( मॉडेल्स ) सादर केल्या होत्या. इयत्ता सहावी ते आठवी या प्राथमिक गटात कु.समृद्धी सुरेश आंबेकर हिने ” स्मार्ट डस्टबिन ” ही प्रतिकृती सादर करून प्रथम क्रमांक संपादन केला आहे. इयत्ता नववी ते बारावी या माध्यमिक गटात साई एकनाथ सस्ते याने ” वायरलेस इलेक्ट्रिक ट्रान्सफर सिस्टीम ” ही प्रतिकृती सादर करून प्रथम क्रमांक पटकावला. दिव्यांग विभागामध्ये इयत्ता दहावीमधील शुभम सुभाष गावडे याने ” केळीचा कोंब ( घड ) काढण्याचे साधन ही प्रतिकृती सादर करून प्रथम क्रमांक पटकावला.  Success of Patpanhale High School in science exhibition

प्रयोगशाळा सहाय्यक परिचर निर्मिती प्रायोगिक साधने या विभागामध्ये संतोष पांचाळ यांनी ” पाण्याचे नमुने तपासणे ” ही प्रतिकृती सादर करून तृतीय क्रमांक पटकावला. माध्यमिक गटातील प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये इ.नववीमधील श्रेयशा सहदेव नरळे व श्रेया अजय पावसकर यांनी तृतीय क्रमांक संपादन केला. तसेच भरडधान्य पाककला शिक्षक विभागात सौ. नमिता प्रसन्ना वैद्य यांनी नाचणी, वरी, राजगिरा व ज्वारी ही धान्ये वापरून थाळीपीठाच्या स्वादिष्ट चवीने प्रथम क्रमांक संपादन केला.  Success of Patpanhale High School in science exhibition

सुयशस्वी विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षक के.डी.शिवणकर, श्री.मयेकर, श्री.बेलवलकर, श्री. इंदुलकर, श्री.निंभोरे, श्रीम.सृष्टी चव्हाण, श्रीम.अनुजा चव्हाण या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. तसेच विज्ञान प्रतिकृती (मॉडेल्स )साठी कु.शुभम पडवळकर या विद्यार्थ्याचे विशेष सहकार्य लाभले. प्रथम व द्वितीय क्रमांक संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रतिकृती सादर करून सुयश संपादन करण्याची संधी लाभणार आहे. गुहागर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनातील सुयशस्वी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मार्गदर्शक शिक्षक यांचे पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष भालचंद्र चव्हाण, उपाध्यक्षा सुचिता वेल्हाळ, सचिव सुधाकर चव्हाण व पदाधिकारी, मुख्याध्यापक व्ही.डी.पाटील, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या. Success of Patpanhale High School in science exhibition

Tags: Success of Patpanhale High School in science exhibition
Share59SendTweet37
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.