गुहागर आगार : संपामुळे एका दिवसात साडेचार लाखांचे नुकसान
गुहागर, ता. 8 : एस.टी.च्या राज्यव्यापी संपात गुहागर आगारातील सर्व कर्मचारी सहभागी झाले. सोमवारी (ता. 8 नोव्हेंबर) 162 फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. गुहागर आगाराचे सुमारे 4 लाख 48 हजार 870 रुपयांचे नुकसान झाले. सोमवारी (ता. 8) आगारात वहातूक नियंत्रक, पर्यवेक्षक आणि आगार व्यवस्थापक हे तीन अधिकारी उपस्थित होते. दरम्यान भाजप आणि मनसेने गुहागर आगारातील कर्मचाऱ्यांची भेट घेवून संपाला पाठिंबा दर्शविला आहे. All the employees of Guhagar depot participated in the statewide strike of ST. On Monday (November 8), 162 rounds had to be canceled. Guhagar depot suffered a loss of about 4 lakh 48 thousand 870 rupees. The traffic controller, supervisor and depot manager were present at the depot on Monday. Meanwhile, BJP and MNS have met the staff at Guhagar depot and expressed support for the strike.


महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलनीकरण व्हावे. या मागणीसाठी एस.टी.च्या कर्मचाऱ्यांनी आज राज्यव्यापी संपाची हाक दिली होती. या मागणीला पाठिंबा दर्शविण्यासाठी आज गुहागर आगारात कडकडीत संप पाळण्यात आला. अनेक चालक, वाहक, यांत्रिक विभागातील कर्मचारी आगारात हजर होते. मात्र त्यांनी काम केले नाही. Maharashtra State Transport Corporation should be merged with the State Government. This is Demand of ST workers. Therefore ST workers had called for a statewide strike on Monday. A strong strike was observed at Guhagar depot. Many drivers, Conductors, mechanical department staff were present in the depot. But they did not work.


गुहागर आगारातून एस.टी.ची पहिली गाडी सकाळी 5 वा. बाहेर पडते. दिवाळी सणामुळे रात्री 9 वाजेपर्यंत गुहागर बसस्थानकात गर्दी असते. आज संपामुळे दिवसभर गुहागर बसस्थानकात चिटपाखरुही नव्हते. सकाळी 5 ते रात्री 9 दरम्यान सुटणाऱ्या ग्रामीण, लांब पल्ल्याच्या आणि अन्य सर्व फेऱ्या आगार व्यवस्थापकांना रद्द कराव्या लागल्या. एकूण 162 फेऱ्या रद्द झाल्या. नित्य वेळापत्रकाप्रमाणे गुहागर आगारातील सर्व गाड्यांचा एकूण प्रवास प्रति दिन 10 हजार 185 किलोमिटर एवढा असतो. त्यातून प्रति किलोमिटर सुमारे 44 रुपयांचा व्यवसाय होतो. याचा विचार केला तर दिवसभराच्या संपामुळे गुहागर आगाराचे सुमारे 4 लाख 48 हजार 870 रुपयांचे नुकसान झाले आहे.
दिवाळीच्या सुट्टीनंतरचा पहिला सोमवार आज असल्याने अनेक शासकीय कर्मचाऱ्यांना कार्यालयात हजर होणे बंधनकारक होते. मात्र सकाळी एस.टी. कर्मचारी संपावर गेल्याने या कर्मचाऱ्यांना खासगी वाहनाने कार्यालयात यावे लागले. दिवाळीच्या सणात भारमान वाढत असल्याने मुंबई, पुणे या मार्गावर सध्या गुहागर आगारातून जादा गाड्या सोडल्या जात आहेत. मात्र संपामुळे गाड्या रद्द झाल्याने आरक्षणे केलेल्या प्रवाशांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
दरम्यान भाजपाचे गुहागर तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे आणि मनसेचे तालुकाप्रमुख विनोद जानवळकर यांनी आगारातील संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांची भेट घेतली. या दोन्ही पक्षांचा कामगारांच्या संपाला पाठिंबा असल्याचे सांगितले.
प्रत्येकवेळी संघर्ष केल्याशिवाय दैनंदिन नगदी उत्पन्न देणाऱ्या महामंडळाच्या कामगारांना काहीच मिळत नाही. प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागतो. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ बरखास्त करुन एस.टी.चे राज्य शासनात विलीनीकरण झाले तरच आमची आर्थिक कुचंबणा थांबेल. संघर्ष थांबेल. यासाठी संघटनांची विचारधारा बाजुला ठेवून सर्व कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत.
– सुभाष पावसकर, गुहागर आगार