ST pay hike
15 दिवस एस. टी. कामगारांच्या संपाने हैराण झालेल्या राज्य सरकारने अखेर 25 नोव्हेंबरला ऐतिहासिक निर्णय घेतला. एस.टी. महामंडळाच्या इतिहासात प्रथमच कर्मचाऱ्यांच्या मुळ पगारात राज्य सरकराने भरघोस वाढ केली. वाढीव पगार वेळेत देण्याची हमी राज्यसरकारने घेतली आहे. दर महिन्याच्या 10 तारखेच्या आधी पगार होण्यासाठी कमी पडेल तो निधी एस.टी. महामंडळाला देण्याचे आश्र्वासन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी वेतनवाढीबरोबरच आणखी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. 15 days of ST statewide strike, Maharashtra state government finally took a historic decision on November 25. In the history of the MSRTC, the state government has increased the basic salaries of employees. The state government has promised to pay the increased salary on time. Deputy Chief Minister and Finance Minister Ajit Pawar has given assurance that, The Funds will be raised by government for the salary before the 10th of every month.
कशी आहे वेतनवाढ?
नवनियुक्त चालक वाहक, यांत्रिकी कर्मचारी यांच्या पगारात 7200 रुपयांची वाढ.
1 ते 10 वर्षे सेवा
मूळ वेतनात 5 हजाराची वाढ,
ज्यांचे वेतन 17 हजार 395 रुपये होते ते आता 24 हजार 595 रुपये होणार.
साधारण 7 हजार 200 रुपयांची म्हणजे एकूण 41 टक्के वाढ.
10 ते 20 वर्षे सेवा
मूळ वेतनात 4 हजार रुपयांची वाढ.
ज्यांचा पगार 23 हजार 40 रुपये होता त्यांचा पगार आता 28 हजार 800 रुपये होणार.
साधारण 5 हजार 760 रुपयांची वाढ
20 वर्षे आणि त्याहून अधिक सेवा
मूळ वेतनात 2 हजार 500 रुपयांची वाढ.
ज्यांना यापूर्वी 37 हजार 440 रुपये वेतन मिळत होते त्यांना आता 41 हजार 40 वेतन मिळेल.
ज्यांना यापूर्वी 53 हजार 280 पगार होता त्यांना 56 हजार 880 पगार मिळेल.
साधारण 3 हजार 600 रुपयांची वाढ
परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलेल्या महत्त्वाच्या घोषणा
दर महिन्याच्या 10 तारखेच्या आधी पगार होणार.
मूळ पगारात वाढ करण्यात आल्याने इतर भत्त्यांमध्येही वाढ होणार.
नवी पगार वाढ नोव्हेंबर महिन्यापासून लागू.
विलीनीकरणाचा मुद्दा समिती समोर आहे. न्यायालयाचा निर्णय मानू.
एसटीची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी समिती स्थापना करणार.
संपकरी कर्मचाऱ्यांचे निलंबन आणि सेवा समाप्ती मागे.
ड्युटी लागली नाही तरी सही करणाऱ्या कामगाराला त्या दिवशीचा पूर्ण पगार मिळणार.