दि. २४ ते ३० जून कालावधीत आयोजन; नावनोंदणी दि. ०७ जून पर्यंत
गुहागर, ता. 04 : तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय वेळणेश्वरमध्ये (Maharishi Parashuram College of Engineering, Velneshwar) सहा दिवसीय सॉफ्ट स्किल्स प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण शिबीर दि. २४ ते ३० जून या कालावधीत सकाळी दहा ते साडेचार वाजेपर्यंत घेतले जाणार आहे. अधिक माहितीसाठी प्रा.औदुंबर पाटकर, भ्रमणध्वनी 9767618228 या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. Soft skills training in Velneshwar college

वेळणेश्वर अभियांत्रिकी महाविद्यालय नेहमीच विद्यार्थी व शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या व्यक्तिमत्वात चांगले बदल घडविण्याच्या हेतूने विविध उपक्रम राबवित असतो. याचाच एक भाग म्हणून या सॉफ्ट स्किल्स प्रशिक्षण शिबीराचे आयोजन केलेले आहे. या नाविन्यपूर्ण प्रशिक्षण शिबिरात इयत्ता बारावी झालेले विद्यार्थी, व्यावसायिक, नोकरदार, गृहिणी तसेच महाविद्यालयातील आजी- माजी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभाग घेऊ शकतात. Soft skills training in Velneshwar college

नावनोंदणी अर्ज दिनांक ०७ जून २०२३ पर्यंत https://forms.gle/XCcsRvYC3EK2HcJd8 या ऑनलाईन गुगल फॉर्मवर भरावा. अधिक माहितीसाठी प्रा.औदुंबर पाटकर, भ्रमणध्वनी 9767618228 या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण शिबीर महाविद्यालयातील सेमिनार हॉल, गणेश दैवज्ञ इमारतीमध्ये आयोजित केले आहे. यावेळी सर्व प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येईल. Soft skills training in Velneshwar college
